नियमांना बगल देत होतेय पाण्याच्या कॅनची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:39 PM2017-10-29T23:39:15+5:302017-10-29T23:39:42+5:30

पिण्या योग्य स्वच्छ व थंड पाण्याच्या कॅन व्यावसायिक प्रतिष्ठानात व विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात ठेवण्याची सध्या शहरासह ग्रामीण भागात प्रथाच रुढ होत चालली आहे.

Water canache transportation is being altered by the rules | नियमांना बगल देत होतेय पाण्याच्या कॅनची वाहतूक

नियमांना बगल देत होतेय पाण्याच्या कॅनची वाहतूक

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : प्रभावी कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पिण्या योग्य स्वच्छ व थंड पाण्याच्या कॅन व्यावसायिक प्रतिष्ठानात व विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात ठेवण्याची सध्या शहरासह ग्रामीण भागात प्रथाच रुढ होत चालली आहे. परंतु, सदर कॅनची वाहतूक सध्या वाहतूक नियमांना फाटा देत होत असल्याने आणि त्याकडे कारवाईची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
वर्धा शहर परिसरात सुमारे ५० व्यावसायिक पाण्याच्या थंड कॅनचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडून नागरिकांना २५ ते ३० रुपये दराने एक पाण्याची थंड कॅन दिल्या जाते. नागरिकही थंड व पिण्या योग्य पाणी प्रतिष्ठानांपर्यंत सहज मिळत असल्याने त्याची खरेदी करतात. परंतु, सदर पाणी खरच पिण्या योग्य असते काय याबाबत अनेकांच्या मनात अजूनही संभ्रम कायम आहे. थंड पाण्याच्या कॅनचा व्यवसाय करणाºयांकडून सध्या मोठ्या प्रमाणात जमिनीतून पाण्याचा उपसा करण्याचा सपाटा लावला जात असल्याचे काही जानकार सांगतात. मात्र, कार्यवाहीची जबाबदारी असलेल्यांचा दुर्लक्षीत कारभार त्यांच्या या व्यवसायाला खतपाणी देणाराच ठरत आहे. परिणामी, संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. थंड पाण्याच्या कॅनचा व्यवसाय करणाºयांकडून मालवाहूत कॅन लादून त्याचा पुरवठा नागरिकांना करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, काही व्यावसायिक आपल्या फायद्यासाठी चक्क वाहतूक नियमांना फाटा देत प्रवासी वाहनांमध्ये सदर कॅन लादून त्याचा नागरिकांना व शहरातील व्यावसायिकांना पुरवठा करीत आहेत. हा प्रकार दिवसाढवळ्या चालत असून त्याकडे कारवाईची जबाबदारी असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त पाण्याच्या कॅनचा भरणा करून त्याची वाहतूक केली जात आहे. हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत असल्याने संबंधीतांनी लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करण्याची सुजान नागरिकांची मागणी आहे.
घरीच करतात पाणी थंड
अनेक छोट्या मोठ्या व्यवसायीकांनी आपल्या घरी पाणी थंड करण्याचे फ्रिजर विकत घेऊन घरच्या विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी या फ्रिजर मध्ये थंड करून कॅन भरल्या जाते. त्या कॅन मालवाहूंच्या सहाय्याने अनेकांच्या प्रतिष्ठांनांपर्यंत पोहोचविल्या जातात. ते पाणी पिण्या योग्य आहे की नाही याची चौकशी कुणीही करण्यास तयार नाही. ते पाणी फक्त थंड असते हे मात्र खरे. दूषित पाण्यामुळे अनेक आजार जडतात हेही तेवढेच खरे.
अनुचित घटनेची शक्यता
थंड पाण्याच्या कॅनचा व्यवसाय करणाºयांकडून वाहतूक नियमांसह विविध नियमांना फाटा दिल्या जात आहे. त्याकडे संबंधीतांचेही दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे.

Web Title: Water canache transportation is being altered by the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.