शेतात जमा होणारे पाणी पोहचले नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:25 PM2017-09-09T23:25:23+5:302017-09-09T23:25:38+5:30
दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दरवर्षी येणाºया पावसामुळे व पुरामुळे शेतात एखाद्या भागात पाणी जमा होवून राहत होते. त्यामुळे ही जागा शेतकºयाला पडिकच ठेवावी लागत होती. या पाण्यामुळे शेतजमीन खराबही होत होती. या त्रासातून शेतकºयाला कायम मुक्ती मिळाली आहे. वर्धा तालुक्याच्या महाकाळ व साटोडा या दोन गावातील २० शेतकºयांना सुक्ष्म पाणलोट विकास तत्वावर आधारित जलसंधारण प्रकल्पातून दिलासा मिळाला आहे.
धाम नदीच्या काठावर असलेले साटोडा व महाकाळ हे दोन गावे या गावातील शेतकºयांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या संकटाला समोर जावे लागत होते. अनेक शेतकºयांच्या शेतात पावसाचे पाणी जमा होवून राहत होते. उतराच्या भागावर असलेली शेतजमीन यामुळे खराब होवून गेली होती. पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे मातीचे ही नुकसान शेतकºयाला झाले. या सर्व त्रासातून मुक्ती मिळावी म्हणून साटोडा व महाकाळ ग्रामसभेने ठराव घेवून गावाजवळून जाणाºया नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण याचे काम हाती घेण्याचे ठरविले. या कामासाठी सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धाचे मिलिंद भगत यांनी पुढाकार घेतला. या कामाला स्थापत्य अभियंता माधवराव कोटस्थाने यांचे मार्गदर्शन लाभले व कामाला सुरूवात झाली. या परिसरातल्या २० शेतकºयांच्या शेतात नाल्यालगत प्रत्येकी दोन पाईप टाकून शेताच्या उतारावर जमा होणारे पाणी नाल्यात सोडण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच या नाल्यावर गॅबीआॅन बंधारा बांधताना शेतकºयांचा रहदारीचा रस्ता बंद होणार नाही याची काळजी घेत दोन ठिकाणी बांध व ओलांडणीचा पुल तयार करून देण्यात आला. त्यामुळे नाला खोलीकरण होवून शेतातील पाणी ही नाल्यात जमा होवू लागले. जलस्त्रोताची पातळी उंचावण्यास मदत झाली.
राज्यात सर्वत्र जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे केली जात आहे. यात नाल्यांचे मुख्य प्रवाह, वळण बदलवून टाकण्यात आले आहे. मात्र साटोडा व महाकाळ येथे उत्तम दर्जाचे कामे झाले आहेत. हे काम राज्याच्या इतर भागासाठी आदर्श ठरणारे आहेत.
- रवींद्र काळी, ज्येष्ठ भूवैज्ञानिक तथा प्रकल्पाचे तांत्रिक मार्गदर्शक.
नाला खोलीकरण कामामुळे आम्हा शेतकºयांना चांगला फायदा झाला आहे. नाल्याला लागून शेत आहे. नाल्याचे पाणी शेतात न येता ते बंधाºयातच जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाणी उपलब्धता वाढली. आता चांगले उत्पन्न होण्यास मदत होणार आहे.
- आकाश भगत, शेतकरी, साटोडा.