आष्टी बसस्थानकावर पाण्याची सुविधाच असुरक्षित
By admin | Published: March 31, 2016 02:43 AM2016-03-31T02:43:29+5:302016-03-31T02:43:29+5:30
राज्य परिवहन मंडळाच्या आष्टी बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकीच असुरक्षित झाली आहे.
टाकीसभोवताल घाण : केवळ एका तोटीतील पाण्यावरच तहान
आष्टी (शहीद) : राज्य परिवहन मंडळाच्या आष्टी बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याची टाकीच असुरक्षित झाली आहे. टाकीच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नाही. नळाच्या तोट्याही तुटल्या आहे. केवळ एका तोटीतून बारिक धार येते असून त्यामधूनच प्रवासी तहान भागवत आहे.
पाण्याची टाकी कित्येक दिवसापासून स्वच्छ केली नसल्याचे प्रावासी सागत आहेत. सध्या उन्हाळ्याच्या तप्त झळा सोसाव्या लागत आहेत. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामांसाठी व मार्केटमध्ये खरेदीसाठी दररोज आष्टीला येतात. सकाळी शालेय विद्यार्थ्यांची गर्दी राहते. विद्यार्थ्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दरवर्षी पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून सामाजिक संस्थाकडून पाणपोई लावण्यात येते. पण ती सुद्धा यावर्षी अजून सुरू झालेली नाही. परिवहन मंडळाच्या तळेगाव आगार अंतर्गत आष्टी बसस्थानकाचा कारभार सुरू आहे.
आगार व्यवस्थापनाचे सतत दुर्लक्ष असल्याने येथील सुविधा खंडित झाल्याचा आरोप प्रवासी करीत आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरू न झाल्यास प्रवाशांनी आगार व्यवस्थापकाच्या दालनात ठिय्या मांडणार असल्याचे सांगितले.