जारचे पाणी; गंदा है पर ठंडा है यह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:08 PM2019-02-28T22:08:44+5:302019-02-28T22:10:10+5:30

जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने भूगर्भातील पाण्याने तळ गाठला आहे. अशाही स्थितीत शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पण; थंडपाणी विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे.

Water of jar; It's cold but it's cold | जारचे पाणी; गंदा है पर ठंडा है यह

जारचे पाणी; गंदा है पर ठंडा है यह

googlenewsNext
ठळक मुद्देअशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी : पाण्याच्या गोरखधंद्याला आळा घालण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने भूगर्भातील पाण्याने तळ गाठला आहे. अशाही स्थितीत शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पण; थंडपाणी विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने पाण्याचे जार विक्रीची गल्लीबोळात दुकानदारी थाटण्यात आली आहे.
कमी खर्चात, कमी जागेत चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून आता पाणी विक्रीकडे बघितल्या जात आहे. सुरुवातीला शुद्धीकरणाचे प्लान्ट टाकून मिनरल वॉटरचे जार विकणारे मोजकेच व्यावसायिक होते. परंतु, भूगर्भातील पाणी उपसून केवळ थंड करुन विकण्याला जास्त खर्च लागत नसल्याने आता पाणी विक्रीचा व्यवसाय शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली पहावयास मिळतो. यात पाण्याच्या शुद्धीबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. बोअरवेलद्वारे आलेले पाणी मशिनद्वारे थंड करून जारमध्ये भरले जाते. तो जार सध्या तीस ते चाळीस रुपयात विकल्या जात आहे. नागरिकही दिवसेंदिवस या थंड पाण्याची मागणी करीत असल्याने पाणी विक्री जोरात आहे. विशेषत: विविध कार्यक्रम, सोहळे, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक उत्सवासह शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि दुकानांमध्येही आता जारमधील थंड पाणी वापरले जात असल्याने पाणी विक्रेत्यांची चांदीच आहे. यावर्षी पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहे. काही भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही आता पिण्यासाठी पाण्याचे जार मागवित आहे. परिणामी मिनरल वॉटरच्या नावे केवळ अशुद्ध आणि थंड पाणीच पुरविल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन या पाणीव्यवसायाला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

पाणी विक्रेते घेताहेत नियमांच्या अभावाचा आडोसा
कोणताही व्यवसाय सुरु करण्याकरिता ग्रामपंचायत,नगरपालिका किंवा नगरपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विकणाऱ्यांकरिता प्रशासनाची कोणतीही नियमावली नसल्याने पाणी व्यावसायिकांचे फावते आहे. मिनरल वॉटरच्या नावाने जारला केवळ लेबल लावून पाण्याची विक्री होत आहे. इतकेच नाही तर ग्रामपंचायत, नगरपालिका व नगरपंचायतची कोणतीही परवानगी न घेता घरीच एका खोली किंवा शेड टाकून पाण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. याकरिता व्यावसायीक कर तसेच व्यावसायिक महावितरणचे मीटर घेणे बंधनकारक आहे. पण, त्यालाही बगल दिल्याने या संदर्भात कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसऱ्या,तिसºया दिवशी बदलते पाण्याची चव
थंड पाण्याच्या हव्यासापोटी चव नसली तरीही नागरिकांकडून पाण्याची मागणी होत आहे. या पाण्याची दुसºया व तिसऱ्या दिवशी या पाण्याची चव आपोआप बदलत असल्याने या पाण्याची शुद्धी व गुणवत्ता लक्षात येते. या गुणवत्ते संदर्भात जारवर कोणतीही माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे आता जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पाणी वापरणाऱ्यावर आहे. अन्यथा हेच पाणी नागरिकांना किडणी स्टोन व इतर दुर्धर आजाराचे गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पाणी विके्रत्यांच्या भरवशावर आपले आरोग्य सुरक्षित समजणे मोठी चूक ठरू शकते. म्हणून नागरिकांनी आता सजग राहून पाऊल उचलायला हवे.

बाटली बंद वॉटरसाठी तसेच आरओच्या पाण्यासाठीही स्टँण्डर्ड आहेत.परंतु, खुल्या पाण्यासाठी कायद्यात स्टॅण्डर्ड नसल्याने, याचाच फायदा पाणी जार विक्रेते घेत आहेत. त्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव विचाराधीन आहे. नागरिकांनी गुणवत्तेबाबत जागरुक रहायला हवे. रविराज धाबर्डे
अन्न सुरक्षा अधिकारी, वर्धा

बंद बाटलीतून होणाऱ्या मिनरल वॉटरच्या विक्रीसंदर्भात कार्यवाही करता येते. मात्र, खुल्या पाणी जार वर कार्यवाही करता येत नाही. याबाबत विभागाच्यावतीने २०१२-१३ मध्ये पाणी जार वितरकाची तपासणी करून कार्यवाही केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने कारवाईवर स्थगिती दिली.
जी.बी.गोरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन वर्धा

Web Title: Water of jar; It's cold but it's cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.