वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:08 PM2019-08-07T14:08:11+5:302019-08-07T14:08:43+5:30

मागीलवर्षी वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.

Water levels rise in Wardha district; But still crisis | वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

वर्धा जिल्ह्यात पाणी पातळी वाढली; पण दुष्काळाचे संकट कायम

Next
ठळक मुद्देकोरडेठाक जलाशय झाले पाणीदार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आषाढसरींच्या दमदार आगमनाने जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेले जलायश पाणीदार झाले. परंतु, मागीलवर्षी या दिवसापर्यंत वर्धा जिल्ह्यातील ११ व नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ४ अशा एकूण १५ मध्यम व मोठ्या जलाशयात सरासरी ४३.२६ टक्के जलसाठा होता. मात्र, यावर्षी केवळ ३१.५१ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवली. यावर्षीसुद्धा पावसाअभावी ही टंचाई आणखीच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोपलेल्या वरुणराजाने जुलै महिन्याच्या अखेरीस हजेरी लावली. आठवडाभर संततधार राहिल्याने जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत जिवंत झाले. इतकेच नव्हे, तर या पावसाच्या सरींमुळे शेतशिवारातही हिरवळ दाटली आहे. यावर्षी आतापर्यंत आठही तालुक्यात ४९१.३८ मि.मी. (५३.३७ टक्के) पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवडाभर झालेल्या पावसामुळे सहा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला. शेतपिकांचे फारसे नुकसान झाले नसून पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या जलाशयाची पातळीने बऱ्यापैकी वाढली असून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच आहे. जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शहरासह १३ गावांना मिळाला आधार
‘मरणाला रात्र आडवी’ ही म्हण नेहमी ऐकली जाते.पण, ही परिस्थिती यावर्षी वर्धेकरांनी अनुभवली आहे. वर्ध्यासह लगतच्या १३ गावांना महाकाळीच्या धाम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी या जलाशयातील मृतसाठाही उचलण्यात आला. मृतसाठ्यातून शेवटचे पाणी सोडून पाणीपुरवठा केल्यांनतर पुढे पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. गांभीर्य लक्षात घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आषाढसरींनी संततधार कायम ठेवल्याने या संकटावर पांघरूण पडले आणि पाण्याचा प्रश्न मिटला. सध्या धाम जलाशयात ३०.२९ टक्के (१८.०२ दलघमी) जलसंचय झाला आहे. मागीलवर्षी याच दिवसापर्यंत ३२.७५ टक्के जलसाठा होता.

Web Title: Water levels rise in Wardha district; But still crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस