शिंगाडा तलावातील पाण्याला दुर्गंधी

By Admin | Published: May 7, 2016 02:14 AM2016-05-07T02:14:00+5:302016-05-07T02:14:00+5:30

येथील शिंगाडा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. यात पाणी साचल्याने ही बाब येथील नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे.

The water in the Shingada pond is bad | शिंगाडा तलावातील पाण्याला दुर्गंधी

शिंगाडा तलावातील पाण्याला दुर्गंधी

googlenewsNext

आरोग्य धोक्यात : तलाव स्वच्छ करण्याची मागणी
नाचणगाव : येथील शिंगाडा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. यात पाणी साचल्याने ही बाब येथील नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाण्यावर शेवाळ वाढली आहे. त्यामुळेच दुर्गंधी येत असल्याचे बोलले जाते. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी होत आहे.
तलावातील पाणी स्थिर असून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या गाळामुळे पाणी प्रवाहीत होण्यास अवरोध निर्माण होतो. या गाळावर शेवाळ वाढत आहे. परिणामी या पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्या सुमारास तर या दुर्गंधीत अधिकच वाढ होत असल्याचे येथील नागरिक सांगतात. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तलावाचे खोलीकरण करावे. त्यामुळे पाण्याचा स्तर कायम राहील व जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल. तलावाचे खोलीकरण त्वरीत सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आहे.(वार्ताहर)

शिवार्पण नगरात समस्यांना उधाण
शिर्वापण नगर परिसरात विविध समस्यांना उधाण आले आहे. तलाव खोलीकरणासह येथील समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची निवेदनातून केली आहे. शिर्वापण नगरातील सांडपाण्यामुळे लगतच्या तिनही कॉलनीतील नागरिक प्रभावीत झाले आहे. तसेच येथील सांडपाण्याचा मुद्दा वरिष्ठ प्रशासकीय स्तरावर गाजला आहे. याची दखल घेत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व पथकाने सदर भागाची पाहणी करून त्वरीत उपाययोजना करण्याचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले. अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. शिगांडा तलावाचे जलयुक्त शिवार योजनेत खोलीकरण करीत दुर्गंधीमुळे होत असलेल्या त्रासापासून दिलासा देण्याची मागणी आहे.

Web Title: The water in the Shingada pond is bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.