समुद्रपूर येथे पाणीटंचाईवर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:15 PM2018-01-09T22:15:23+5:302018-01-09T22:15:48+5:30
हिवाळा असताना जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यात समुद्रपूर तालुक्यातील काही भागात प्रत्येक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जावणते.
आॅनलाईन लोकमत
समुद्रपूर : हिवाळा असताना जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यात समुद्रपूर तालुक्यातील काही भागात प्रत्येक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जावणते. यावर प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. यामुळे ही टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात आल्याने येथे नुकतीच आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, पंचायत समितीच्या सभापती कांचन मडकाम, उपसभापती योगेश फुसे, तहसीलदार दीपक करंडे, गटविकास अधिकारी धोत्रे, जि.प. सदस्य शुभांगी डेहणे, जयश्री चौखे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते. सभेदरम्यान प्रत्येक कर्मचारी आणि सदस्यांनी संभाव्य पाणीटंचाई असलेल्या गावांची माहिती सभागृहाला दिली.
यावेळी तालुक्यात उद्भवत असलेल्या पाणी टंचाईबाबत चर्चा करण्यात आली. पंचायत समितीच्या सदस्यांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई उद्भवणाºया संभाव्य गावांची माहिती दिली. यावेळी आमदार कुणावार यांनी गावात सध्या अस्तित्त्वात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताची माहिती घेत त्यांच्या बळकटीकरण यासंंदर्भात कार्यक्रम आखण्याच्या सूचना यावेळी केल्या. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी तालुक्यातील समस्या निवारणाकरिता कुठलीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत पाणी टंचाईमुक्त तालुका करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी नागरिकांचीही उपस्थिती होती.