खडकाळ भागात साठवले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:46 PM2018-12-03T22:46:02+5:302018-12-03T22:46:29+5:30
यावर्षी अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. ऐन हिवाळ्यात नदी, नाले व तलावही कोरडे पडले आहेत. अशाही स्थितीत आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेऊन जंगलातील खडकाळ भागात पाणी साठवणूक करण्याची किमया साधली. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी सोय झाली आहे.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली. ऐन हिवाळ्यात नदी, नाले व तलावही कोरडे पडले आहेत. अशाही स्थितीत आष्टीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेऊन जंगलातील खडकाळ भागात पाणी साठवणूक करण्याची किमया साधली. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी पिण्यासाठी सोय झाली आहे.
आष्टी वनविभागाने जंगलात वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान सन २०१८-१९ मधून प्रती २७ रूपये घनमीटर खोदकाम मधून कठीण भागात नाला खोलीकरण केले. काही भागात कधीही पाणी लागले नव्हते, अशाही ठिकाणी पाणी लागले. या पाण्याला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजनाही करण्यात आल्याने अनेक भागातील नाल्यामध्ये पाणीसाठा संचयित आहे. येनाडा, पिलापूर, माणीकवाडा, तारासावंगा, किन्ही, मोई, पांढुर्णा, वडाळा, वर्धपूर, झाडगाव, पोरगव्हाण, पंचाळा या भागातील वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय झाली आहे. खडकाळा भागात पाणी लागल्यामुळे खºया अर्थाने जलयुक्त शिवार अभियाना लाभ मिळल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी सिमेंट क्रॉक्रीटचे १४ पाणवठे यापूर्वी तयार केले आहे. त्यामध्ये कृत्रिम पध्दतीने पाणी सोडल्या जाते. याठिकाणी वन्यप्राण्यांनी पाणी पिण्यासाठी नित्याने येजा सुरू केली आहे. जंगलात रोही, बिबट, अस्वल, ससे, हरिण, माकड, रानडुक्कर, मोर यासारखे असंख्य प्राणी वास्तव्य करीत आहे. पूर्वी जंगलप्रदेश जास्त असल्याने वन्यप्राणी शेताकडे येत नव्हे. मात्र काळाच्या ओघात जंगल कमी झाले आहे. त्यातच पाणी उपलब्ध होत नसल्याने ते गावाकडे कूच करीत आहे. शिकारी करणारे सुध्दा याचाच गैरफायदा उचलतात. अशावेळी वनविभागाची ही उपाययोजना दिलासा देणारी ठरत आहे.
दुष्काळग्रस्त भागात पाणी पातळी वाढली
जलयुक्त शिवार अभियानमधून अनेक कामांना प्राधान्य देण्यात आले. वनतलाव, सलग समतल चर, गुरे प्रतिबंधीक चर, नाला खोलीकरण यासारखा योजनांना पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील पाण्याची पातळी वाढावी. हा त्यामागचा मुळ उद्देश आहे. राज्य शासनाच्या सर्व योजना चांगल्या आहे. त्याची अंमलबजावणी करणाºया यंत्रणा किती प्रभावी आहे. यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे.
वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय
परिसरातील येनाडा, पिलापूर येथील नाला खोलीकरण कामाची पाहणी केली असता तेथे चार महिने पिण्यासाठी पाणी पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. सोबतच नाल्याच्या बाहेर खोदलेल्या लहान नालीमध्येही पाणी असल्याने वन्यप्राणी उन्हाच्या वेळी येथे येवून बसत असल्याची माहिती वनरक्षक इंद्रपाल भगत यांनी दिली आहे. आष्टी वनविभाग गेल्या दोन वर्षापासून विविध उपक्रम राबवून शासनाच्या योजना पुर्णत्वास नेत आहे. त्यामध्ये ही उपाययोजना प्रशंसनीय आहे.
वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जलयुक्त शिवार अभियान मधून २७ रूपये घनमीटरने नाला खोलीकरण काम हाती घेतले. सदर नाल्यांना पाणी लागल्याची उपलब्धी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला.
- अमोल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).