कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:47 PM2019-05-11T23:47:40+5:302019-05-11T23:48:28+5:30

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.

Water supply to the citizen without requiring law enforcement | कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

कायद्याच्या चाकोरीत न बसविता नागरिकांना पाणीपुरवठा करा

Next
ठळक मुद्देपंकज भोयर यांचे निर्देश। अधिकाऱ्यांची घेतली निवासस्थानी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिलेत.
वर्धा विधानसभा क्षेत्रातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जि.प. महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, सेलू पं.स.च्या सभापती जयश्री खोडे, वर्धा पं.स.च्या सभापती महानंदा ताकसांडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, अर्चना टोनपे, सायंकार, सरस्वती मडावी, राणा रणनवरे, पं.स. सदस्य अमित गावंडे, अशोक मुडे, प्रफुल्ल मोरे, चंदा सराम, दुर्गा ताजने, ज्योती टिपले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत, नायब तहसीलदार जाधव, तिनघसे, गटविकास अधिकारी इसाये, पाटील यांच्यासह सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी पहिल्या व दुसºया टप्प्यात पाणी टंचाई संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनाचा आढावा आ. डॉ. पंकज भोयर यांनी घेतला. मागील दोन वर्षात पर्जन्यमान कमी झाले असून उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगून जलस्त्रोत झपाट्याने कमी होत असल्याने पाणी समस्या गंभीर होत असल्याचे सरपंचांनी सांगितले. गावातील बोअरवेल, विहिरी आटत असून नैसर्गिंक जलस्त्रोत पूर्ण पणे आटले आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. गावातील विहिरींचे खोलीकरण, नवीन विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणी पुरवठा याबाबीवर काम करण्यात यावे, अशी सूचना सरपंचानी केली. यावेळी आ. भोयर यांनी सर्वांच्या अडचणी जाणून घेत प्रत्येकासाठी पाणी महत्वाचे आहे. माणसासोबतच जनावरांना सुद्धा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. पाणी टंचाईची समस्या गंभीर असून ती सोडविण्याला अधिकाऱ्यांनीही प्राथमिकता द्यावी.
प्रत्येक गावातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना केल्या. वर्धा शहराशेजारील ग्रामीण भागासह पांढरकवडा पारधीबेडा येथील पाणी टंचाई बाबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, अशा सूचना अधिकाºयांना आ. भोयर यांनी दिल्या. बैठकीला अशोक कलोडे, आशिष कुचेवार, विजय खोडे, वासुदेव देवडे, शुभंगी मुडे, संदीप पाटील, खोसे आदी हजर होते.
जाणून घेतल्या गावातील समस्या
आमदार पंकज भोयर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीदरम्यान वर्धा शहराशेजारी असलेल्या गावांमधील सरपंचांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आमदारांसमोर गावातील पाणीसमस्येचा पाढाच वाचला. यामुळे अधिकाºयांची मात्र तारांबळ उडाली.

Web Title: Water supply to the citizen without requiring law enforcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.