पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:10 AM2019-03-06T00:10:14+5:302019-03-06T00:11:21+5:30

शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

Water supply damaged by water | पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जमीनदोस्त

पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देपुरवठा सुरळीत करण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
सध्या पाणी टंचाईमुळे अनियमित झालेला पाणीपुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने लोअर वर्धा धरणाकडे १५ लाख रूपये जमा केल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले. नागरिकांनी पाणीटंचाई लक्षात सहकार्य केल्यास पूर्ववत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही नगराध्यक्ष शीतल गाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहर व परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता शेकडो कोटी रूपये खर्चाचे पुलगाव बॅरेज बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ठराविक मुदतीत बॅरेजचे काम पूर्ण झाले नाही. भीषण पाणीटंचाईच्या काळात शहराला पाणीपुरवठा करणाºया हरिरामनगर, दयालनगर, गणेशनगर, आठवडी बाजार यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था व काही ठिकाणच्या मोठ्या विहिरी जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे.
पूर्वी पाणीटंचाई नागरिक शहरातील मोठ्या विहिरींच्या पाण्याचा वापर करीत होते. परंतु, आज त्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहरात नळयोजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. परिणामी मागील काही दिवसात चार-पाच दिवसांआड पाणी पुरवठा सुरू होता. नगर प्रशासनाने लोअर वर्धा प्रशासनाकडे १५ लाख रूपये भरल्यामुळे लोअर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आले असून शहराचा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. याशिवाय पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात विविध वॉर्डात ३४ बोअरवेल करण्यात आल्या असून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नगराध्यक्ष गाते यांनी केले आहे.

नदीपात्राला कोरड
यंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने शहरालगत वाहणाºया वर्धा नदीपात्राला अनेक ठिकाणी कोरड पडली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित झाला आहे. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा तीन-चार दिवसांवर आला. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Water supply damaged by water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.