समुद्रपूर येथे नवतपात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:48+5:302021-05-27T04:42:48+5:30
नगरपंचायतच्या नळ योजनेचा पाणीपुरवठा कधी ४ दिवसानंतर तर कधी ५ ते ७ दिवसाच्या अंतराने होत आहे. त्यामुळे ...
नगरपंचायतच्या नळ योजनेचा पाणीपुरवठा कधी ४ दिवसानंतर तर कधी ५ ते ७ दिवसाच्या अंतराने होत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाला पाणीटंचाईची झळ बसत आहे. नवीन काॅलनी व नवीन बांधलेले घरी विहीर खोदलेली आहेत पण एप्रिल महिन्यातच विहीर कोरड्या पडतात . त्यामुळे पाणीटंचाईची झळ सर्वांनाच सोसावी लागते . काही वार्डात तर टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो पण नगरपंचायतचे लक्ष नसल्याने येथील मनीष गांधी यांनी आ. समीर कुणावार यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. व गावाला टॅंकरने पाणी वाटण्याची विनंती केली. आ. समीर कुणावार यांनी त्वरित दखल घेऊन समुद्रपूर शहराला टॅंकरने पाणी वाटपाला सुरुवात केली. पावसाळा सुरू होईपर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी आहे.