पिपरी (मेघे) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:21 PM2019-04-26T21:21:23+5:302019-04-26T21:22:55+5:30
शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात पाणी प्रश्न गंभीर होत असून सध्या दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरुअसल्याने प्रशासनाकडून नागरिकांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनातून केली.
पिपरी (मेघे) येथील लोकसंख्या ३७ हजारापेक्षा जास्त आहे. लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचाही वापर वाढला आहे. त्यामुळे विहिरी व हातपंपापीही तळ गाठल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. जीवन प्राधिकरणाकडून दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे उपाय योजनांकरिता पं.स.च्या बैठकीत सदस्य प्रफुल्ल मोरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच सरपंच अजय गौळकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रीती डुडुलकर व गट विकास अधिकारी स्वाती ईसाये यांना निवेदन देऊन आठ टँकरची मागणी केली. निवेदन देताना पं.स. सदस्य राजेश राजुरकर, प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, सदस्य गजानन वानखेडे, प्रशांत खंडारे, वैभव चाफले, सुधिर वसू, पंकज उजवणे, सुरेंद्र झाडे, मनीष मेश्राम, कुमुुद लाजुरकर, डॉ.विद्या कळसाईत, भारती गाडेकर, सीमा दोडके, दिक्षा जीवणे, नलिनी परचाकी, ज्योती वाघाडे, दिपमाला राजुरकर, शुभांगी पोहणे यांची उपस्थिती होती.