उमरगाव परिसरात पाण्याचा साठा वाढणार

By admin | Published: January 8, 2017 12:47 AM2017-01-08T00:47:08+5:302017-01-08T00:47:08+5:30

राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण,

The water supply will increase in the Umergaon area | उमरगाव परिसरात पाण्याचा साठा वाढणार

उमरगाव परिसरात पाण्याचा साठा वाढणार

Next

जलयुक्त शिवार : शेती येणार ओलिताखाली
झडशी : राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्या आली. यात नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण करून बंधारे बांधले जात आहेत. परिणामी, विहिरींची पातळी वाढून सिंचनाची सुविधा मिळत आहे. उमरगाव येथे मात्र ही योजना राबविली जात नव्हती. यासाठी शेतकरी व सरपंचांनी संयुक्त प्रयत्न केले. आता या गावाचीही जलयुक्त शिवारसाठी निवड झाल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.
उमरगाव परिसरातील शेतकरी आणि सरपंच यांनी जलयुक्त शिवार अभियान आपल्या गावात राबविले जावे यासाठी प्रयत्न केले. अखेर जि.प. लघुसिंचन विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. ओलिताचा प्रश्न लक्षात घेत लाखो रुपयांची कामे उमरगाव परिसरात सुरू करण्यात आली आहेत. गत कित्येक वर्षांपासून नदीमध्ये गाळ साचला होते. जलयुक्त शिवारमधून या नदीचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात येणार आहे. याच नदीवर बंधारे असल्याने पाणी साठा वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ओलिताची सोय उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या या कामांत शेतकरी कुणाल जयस्वाल, सरपंच विवेक हळदे आणि जि.प. लघुसिंचन विभाग वर्धा यांचा वाटा मोलाचा ठरला आहे. सिंचन सुविधा वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)

Web Title: The water supply will increase in the Umergaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.