जलसंधारणाची कामे मनरेगातून करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:36 PM2018-05-16T23:36:04+5:302018-05-16T23:36:04+5:30

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला.

Water works should be done from MNREGA | जलसंधारणाची कामे मनरेगातून करावी

जलसंधारणाची कामे मनरेगातून करावी

Next
ठळक मुद्देधर्मवीर झा : केंद्रीय पथकांनी केली कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला. यावेळी मनरेगामधून होणाऱ्या कामांमध्ये ६० टक्के कामे जलसंधारणाची घ्याव्यात, अशा सूचना मनरेगाचे संचालक धर्मवीर झा यांनी केल्यात.
या पथकामध्ये मनरेगा कार्यक्रम अधिकारी सोनल कुलश्रेष्ठ, अनिलकुमार कट्टा, वैभव माहेश्वरी, म्रीदुल गर्ग, राजकुमार दत्ता यांचा समावेश होता. या पथकाने कारंजा तालुक्यातील येनगाव येथे फळबाग लाभार्थी श्रीराम चोपडे आणि शिलाबाई देवासे यांच्या शेतात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शिवाय मधुकर चोपडे यांच्या शेतात मनरेगामधून करण्यात आलेल्या सिंचन विहिरीची पाहणी करण्यात आली. पालोरा ग्रामपंचायत येथे जागो मानमोडे यांच्या घरकुलास भेट देऊन पाहणी केली. शिवाय आर्वी तालुक्यातील सावळापूर येथील रोप वाटिकेतील कामाचे निरीक्षण केले. ग्रामपंचायतीमधील नरेगा सबंधी दस्तऐवज, योजनेसंबंधी कामाचे भिंतीफलक, ग्रामपंचायतमधील १ ते ७ नमून्यांचे अद्यावतीकरण, नवीन नमुन्यातील जॉब कार्ड वितरण आदी अभिलेखांची तपासणी केली.
क्षेत्रीय भेटीनंतर केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मनरेगाच्या कामांचे सादरीकरण केले. यात २०१८-१९ या वर्षात १ लाख ७८ हजार ४४३ मनुष्य दिवस काम निर्मिती झाल्याचे सांगितले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार कुटुंबांना जॉब कार्ड वितरित करण्यात आले आहेत. यापैकी १८ हजार ६२७ नागरिकांनी कामाची मागणी केली असून १२ हजार ४७१ लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ७४ कुटुंबाने १०० दिवस काम केले आहे. यात ९३ टक्के लोकांना वेळेवर वेतन देण्यात आले आहे. मनरेगामधून मार्च २९१८ पर्यंत ४ हजार २६१ मंजूर विहिरींपैकी २ हजार ४७० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. यापैकी २ हजार २१४ लाभार्थ्यांचे वीज पंप जोडणीसाठी अर्ज प्राप्त झाले असून २ हजार ४ लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली आहे. जॉब कार्ड तपासणीचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी नवाल यांनी पथकाला दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती आदी उपस्थित होते.
 

Web Title: Water works should be done from MNREGA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.