जल प्राधिकरणाला बेशरमचे झाड भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:27 PM2017-12-18T23:27:14+5:302017-12-18T23:27:58+5:30

पिपरी (मेघे) परिसरातील प्राधिकरणाची जलवाहिनी अनेक महिन्यांपासून लिकेज आहे. या संबंधात प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले.

Waterproof visit to the water authority | जल प्राधिकरणाला बेशरमचे झाड भेट

जल प्राधिकरणाला बेशरमचे झाड भेट

Next
ठळक मुद्देतक्रार करूनही जलवाहिनीच्या लिकेज दुरुस्तीकडे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमत
वर्धा : पिपरी (मेघे) परिसरातील प्राधिकरणाची जलवाहिनी अनेक महिन्यांपासून लिकेज आहे. या संबंधात प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले. मात्र जलवाहिनीची कायमस्वरूपी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा करताना जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे समता सामाजिक युवा संघटनेने प्राधिकरण विभागाला बेशरमचे झाड देऊन दिरंगाईचा निषेध केला.
वाहनचालकांना या रस्त्याने वाहन चलविणे कठीण झाले आहे. प्राधिकरणाचे नळाकरिता पाणी सोडल्यावर अर्धेअधिक पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे चिखल रस्त्यावर होतो. शिवाय पाण्याचा यात अपव्यय होत आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. चिखलामुळे वाहने घसरून येथे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. समस्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने देण्यात आले. हे निवेदन अधिकारी नसल्यामुळे गायकवाड यांनी स्वीकारले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी विक्की खडसे, चिरंजीव उमरे, फैजल खान, अर्चित निगडे, हर्षल तराळे, अनिकेत कोटंबकार, नितीन गुल्हाने, अभिषेक वाकोडे, कुणाल वानखेडे, अमित तिखे, प्रतीक वानखेडे, तुषार भुते, योगेश पवार, ऋषीकेश इंगोले, सौरभ सोमनकर उपस्थित होते.
पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी
पिपरी (मेघे) परिसरातील नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयात भेट देऊन जलवाहिनी लिक होत असल्याची तक्रार केली असता त्यांना कार्यालयातील कर्मचारी अरेरावीची उत्तरे देतात, असे निवेदनात नमूद केले आहे. जलवाहिनी लिक असल्याने पाण्याचा अपव्यय होत असून या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.

Web Title: Waterproof visit to the water authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.