विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून मिळाला यशाचा मार्ग

By admin | Published: April 10, 2016 02:31 AM2016-04-10T02:31:21+5:302016-04-10T02:31:21+5:30

'लोकमत' व 'विद्यालंकार'च्या वतीने दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा...

The way to achieve the success of the students from the workshop | विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून मिळाला यशाचा मार्ग

विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून मिळाला यशाचा मार्ग

Next

'लोकमत' व 'विद्यालंकार'तर्फे मार्गदर्शन
वर्धा : 'लोकमत' व 'विद्यालंकार'च्या वतीने दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा 'यशाचा मार्ग - २0१६'चे आयोजन ३१ मार्च रोजी विद्यादीप हॉटेल, यशवंत कॉलेज जवळ, लक्ष्मीनगर, वर्धा येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विद्यालंकारकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून शिक्षणतज्ज्ञ संदीप पाटील, विद्यालंकार क्लासेसचे संचालक निता घुसे, संचालक प्रणव घुसे, विद्यालंकार वर्धा शाखेचे लोकमतचे कार्यालयप्रमुख उमेश शर्मा तसेच जिल्हाप्रतिनिधी राजेश भोजेकर आदि मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी संदीप पाटील यांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणासाठीच्या आयआयटी - जेईई अँडव्हान्स, जेईई मेन, एमएचसीईटी यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी किमान ५0 सेकंदांचा वेळ लागतो व यासाठी विद्यार्थ्यांचा सराव महत्त्वाचा असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांनी कधीही हार न मानता आयुष्यात इतरांपेक्षा काही वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते.
याशिवाय जे आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करू शकतात त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे अनन्यसाधारण स्थान आहे. त्याने केवळ शिक्षकाची भूमिका न बजावता मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली पाहिजे.
सध्याच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात सर्वोत्तम शिक्षकाशी संवाद साधून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उठविणे सहज शक्य झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वर्धामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या मनोगतानंतर पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मान्यवरांनी सर्मपक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यशाळेसाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, विद्यालंकारतर्फे रविवार १० एप्रिल रोजी फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषयांचे वर्धा येथील कार्यालयात सकाळी ११ या वेळात मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता आणि अ‍ॅप्टीट्युट टेस्ट नोंदणीकरिता ७३८७६७६९१०, यांच्याशी संपर्क साधावा.(उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: The way to achieve the success of the students from the workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.