‘आम्ही दोघी माय लेकी’ स्पर्धा आज

By admin | Published: December 22, 2016 12:27 AM2016-12-22T00:27:27+5:302016-12-22T00:27:27+5:30

जगणे पुरे झाले जगवायचे आता, आयुष्य एकवार फुलवायचे आता, असे म्हणत आयुष्याचा आनंद घेणारे आणी

'We are both my Lechi' competition today | ‘आम्ही दोघी माय लेकी’ स्पर्धा आज

‘आम्ही दोघी माय लेकी’ स्पर्धा आज

Next

कलर्स व सखी मंचचे आयोजन : नात्याची वीण घट्ट करणारा कार्यक्रम
वर्धा : जगणे पुरे झाले जगवायचे आता, आयुष्य एकवार फुलवायचे आता, असे म्हणत आयुष्याचा आनंद घेणारे आणी देणारे आमचे पालक आणि कुटुंबातील इतर ज्येष्ठ मंडळी. आपल्या मुलांना चांगले जीवन आणि भविष्य देण्यासाठी स्वत:च्या आवडी निवडी आणि गरजा बाजुला ठेवणारे पालक खरं तर आपल्या आयुष्याचा मुख्य पाया असतो. ज्यावर आमचे करिअर, भविष्य अवलंबून असते. त्यातही आईची भूमिका ही जास्त संवेदनशील असते. कर्तव्य आणि प्रेम याचा सुरेख संगम साधणे हे केवळ आईलाच जमते. हेच नेमके कलर्स प्रस्तुत ‘एक श्रृंगार.. स्वाभिमान’ या नवीन मालिकेतून प्रेक्षकांसाठी लोकमत सखी माध्यमातून सुंदर विषय आपल्या भेटीला येत आहे.
स्थानिक रंजन सभागृह, वंजारी चौक, वर्धा येथे गुरूवारी दुपारी ४.३० वाजता हा कार्यक्रम होईल. यात लेकींसाठी विविध स्पर्धा होणार आहे. सुरुवातीला त्यांनी परिचय फेरीमध्ये एकमेकींचा परिचय करुन घ्यायचा आहे. त्यानंतर कलाविष्कार फेरी आणि परिस्थितीनुरुप निर्णयक्षमता व प्रश्नोत्तर फेरी होईल.
आई व मुलीची एकमेकांप्रति असलेली बांधिलकी, जवळीक, त्यांच्या नात्यातील तरलता, एकमेकींना सांभाळण्याचे कसब या स्पर्धेत दिसून येईल. यातून मायलेकीचे नाते अजून घट्ट होईल. नात्यातील ओलावा जपणारा हा कार्यक्रम असून मनोरंजनात्मक गीत व नृत्याचे कार्यक्रम यावेळी सादर होतील.
कलर्स चॅनेलवर १९ डिसेंबर २०१६ पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ‘एक श्रृंगार... स्वाभिमान’ ही आई व मुलींच्या घट्ट नात्यांवर आधारित मालिका सुरू होत आहे. या मालिकेत गणिताची शिक्षिका असणाऱ्या शारदाने तिच्या दोन मुलींना पुढारलेल्या विचारांसह स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला आहे. मुलींना कर्तृत्ववान बनविल्यानंतर तिची नौकरी आधी आणि घर नंतर या विषयावर काम शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. ज्यात नौकरी करणे म्हणजे फक्त अर्थार्जन नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याचा तो एक मार्ग आहे, असे तिला सांगावे वाटते.
घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीसाठी करिअरला जास्त महत्त्व देणारी स्त्री ही आदर्श का नाही असा प्रा्रमाणिक प्रश्न शारदा उपस्थित करते. तिच्या या सर्व प्रश्नांना काय उत्तरे आहेत हे या मालिकेत कळेलच. पण आम्ही दोघी मायलेकी या स्पर्धेतूनसुद्धा या विषयांवर प्रकाश टाकला जाईल. या स्पर्धेसाठी मायलेकींच्या जोड्या असणार आहे. यात मुलीचे वय कमीतकमी १० वर्षे असावे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे.
सखी मंच नेहमीच नवनवीन उपक्रम राबविते. महिलांकरिता नाविण्यपूर्ण विषय देण्याकरिता हा कार्यक्रम असणार आहे. बोचऱ्या थंडीत आई आणि मुलींच्या विविध स्पर्धा रंगतील. त्यांच्या नात्यातील वीण अधिक घट्ट होईल यात शंका नाही. माय-लेकीच्या पे्रमाचा कलर, एकमेकांचा स्वाभिमान जपण्याची धडपड या कार्यक्रमात बघण्यास मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व सखी मंच सदस्य व प्रेक्षकांसाठी खुला असून परिवारासहीत सदस्य आमंत्रित आहेत. अधिक माहिती प्रियंका मोहोड-९७६७७०४१२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.(उपक्रम प्रतिनिधी)

Web Title: 'We are both my Lechi' competition today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.