आम्हा नसे कुणाची पर्वा न् भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 05:00 AM2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:26+5:30

पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर्दी वाढून त्या ठिकाणी आर्ट्यापार्ट्याही रंगू लागल्या होत्या.

We didn't care about anyone | आम्हा नसे कुणाची पर्वा न् भीती

आम्हा नसे कुणाची पर्वा न् भीती

Next
ठळक मुद्देबंदीतही शोधली संधी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाकाळात घरामध्ये राहून त्रस्त झालेल्या नागरिकांनी मुक्त श्वास घेण्याकरिता पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या जलाशयाकडे धाव घेतली. या ठिकाणी चांगलीच गर्दी वाढायला लागली होती. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जलाशयाकडे जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पण, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला संधी शोधून नागरिकांनी जलाशयावर जाऊन आपली हौस भागवून घेतली.
पावसामुळे जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाल्याने काही जलाशयाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. हे निसर्ग सौदर्य बघण्यासाठी नागरिकांनी रिधोरा, मदन उन्नई, पंचधारा, महाकाळी, निम्न वर्धा, बोरधरण व पवनार येथे गर्दी करायला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस ही गर्दी वाढून त्या ठिकाणी आर्ट्यापार्ट्याही रंगू लागल्या होत्या. कोरोनाच्या काळात संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा उपविभागातील जलाशयावर जाऊन पाहणी केली. स्वातंत्र्यदिनी शनिवार आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने या दोन्ही दिवशी जलाशयांवर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता जलाशयावर जाण्यास मनाई करुन दंडात्मक कारवाई करण्यासोबतच वाहनही जप्त करण्याचे आदेश दिले. तरीही उत्साही नागरिकांनी या आदेशाकडे पाठ फिरवित स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे शुक्रवारी बºयाच जलाशयावर जाऊन आपली ईच्छा पूर्ण करुन घेतली. काहींनी जलाशयावरील व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले तर काहींनी व्हाट्सअ‍ॅपचे स्टेटसही ठेवले होते. त्यामुळे प्रशासनाच्या निर्देशाकडे डोळेझाक करणाºया या नागरिकांनी ‘आम्हा नसे कुणाची पर्वा न भीती’ असे कृतीतून दाखवून दिले आहे.

पवनारमध्ये जत्रेचे स्वरूप
पवनार येथील धामनदीवर नागरिकांची नेहमीच गर्दी पहावयास मिळते. या ठिकाणी असलेल्या बंधाºयावरुन पाणी वाहत असल्याने हे निसर्गसौदर्य बघण्यासोबतच पोहोणाऱ्यांचीही संख्या बरीच असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी अपेक्षा होती. पण, सैराट झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी पवनार येथे चांगलीच गर्दी केली होती. या ठिकाणी नदीपात्रालगतच्या मार्गावर दोन्ही बाजुनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानांमध्येही गजबज दिसून आली.

Web Title: We didn't care about anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.