आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:12 PM2018-05-21T22:12:09+5:302018-05-21T22:12:23+5:30

अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

We will contest 288 seats in the coming assembly | आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

आगामी विधानसभेत २८८ जागा लढविणार

Next
ठळक मुद्देज्ञानेश वाकुडकर : लोकजागर अभियानची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. आम्ही कुठलेही आंदोलन न करता मतदारांना त्यांचा रोष मतपेटीतून व्यक्त करा, असे आवाहन करीत आगामी निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागा लढू, अशी माहिती लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वाकुडकर पुढे म्हणाले, रविवारी सेवाग्राम येथे आमची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आम्ही या देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थी दशेतील तरुण-तरुणींशी ६० महाविद्यालयात जावून संवाद साधला आहे. त्यांना आम्ही आमच्या अभियानाच्या आठ कलमी कार्यक्रमाची माहिती समजावून सांगितली आहे. सध्या भांडवलशाही, बेरोजगारी, गुन्हेगारी आदी वाढत असल्याने आम्ही मतदारांपुढे शुन्य लोकशाही, गाव तेथे उद्योग, कृषी धर्म-कृषी संस्कृती, मोफत आरोग्य-शिक्षण, सामाजिक सरकार-सामाजिक उद्योग, एक गाव-एक परिवार, नवा भारत-युवा भारत व जलद न्यायालय- पारदर्शी न्याय हे विषय घेवून जाणार आहो, असे सांगितले.
सर्वसामान्यांचे नेतृत्त्व करणाºया राजकीय क्षेत्रात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा जास्तीत जास्त समावेश असल्याचे दिसून येते. याला आळा घालण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय-पारदर्शी न्याय ही संकल्पना घेवून मतदारांपुढे जाणार आहे. या संकल्पनेनुसार एखाद्या राजकीय पुढाºयावर असलेल्या खटल्याचा निकाल तीन वर्षात अपेक्षीत आहे. जिल्हा न्यायालय दोन वर्षात न्यायनिवाडा करेल. त्यावर अपील झाल्यास उच्च न्यायालय सहा महिन्यात प्रकरण निकाली काढेल. त्यावरही अपील झाल्यास सर्वोच्च न्यायालय त्यानंतरच्या सहा महिन्यात प्रकरणाचा न्याय निवाडा करेल, अशी संकल्पना आहे.
परंतु, यासाठी न्यायालयांची संख्या व त्यामधील मनुष्यबळ वाढविणे गरजेचे राहणार असल्याचे यावेळी वाकुडकर यांनी स्पष्ट केले, सध्या आमच्याकडे सुमारे नवे २५ चेहरे मतदारांसमोर निवडणुकीच्या वेळी पर्याय म्हणून देण्यासाठी आहेत. परंतु, सहा महिन्यात यादी अद्यावत होईल, असेही यावेळी प्रा. वाकुडकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संजय वानखेडे, कौस्तुब कावळे, दगडू पडिले, महादेव मिरगे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: We will contest 288 seats in the coming assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.