शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:16 AM2019-06-03T00:16:27+5:302019-06-03T00:17:22+5:30

सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकºयांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

 We will implement separate policies for power connection to farmers | शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी स्वतंत्र धोरण राबविणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : खरीप नियोजन आढावा बैठक, विविध विषयांवर झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकऱ्यांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स्वतंत्र धोरण राबविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
जि.प.च्या सभागृहात २०१९-२० खरीप हंगामाची नियोजन व आढावा बैठक रविवारी पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, राज्य कृषी आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे आदींची उपस्थिती होती. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, इतर विभागाच्या बैठकींपेक्षा खरीप आढावा व नियोजन बैठक अतिशय महत्त्वाची आहे. सौर कृषिपंपासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दिल्यापासून एक महिन्याच्या आत त्याच्या शेतात सौर कृषीपंप लागणे गरजेचे आहे. संबंधित एजंन्सीने हे काम प्राधान्याने करावे. ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ लागत असले तर अशा एजन्सीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावेत. पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रतीक्षा करू नका. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग आणि बँकांनी पोहोचले पाहिजे. यासाठी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करावे. शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून हे मेळावे घेण्यात यावे. केवळ उद्दिष्टपूर्तीकरिता मेळावे घेऊ नका. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणे योग्य नसून कुठल्याही बँकेने शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाचे नियोजन करा
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून खरिपाबाबत योग्य नियोजन कृषी विभागाने केले पाहिजे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांपासून ते कृषी सहाय्यकांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी. नियमाच्या चौकटीत राहून काम करायचे असले तरी शेतकऱ्यांना मानवतेची वागणूक द्या. प्रतिबंधित बीटी, निकृष्ट दर्जाची खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कठोरच कारवाई करा. ही कारवाई करताना कुठलीही हयगय अधिकाऱ्यांनी करू नये. नामधारी तपासणी मोहीम न राबविता त्याला आणखी कसे प्रभावी करता येईल, यावर विचार करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी. खत आणि बियाण्यांचा काळाबाजार याबाबत एखादी गुप्त माहिती मिळाल्यावर तातडीने कारवाई होणे क्रमप्राप्त आहे. भरारी पथकामध्ये प्रामाणिक आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असेही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

Web Title:  We will implement separate policies for power connection to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.