प्रत्येक गाव समृद्ध बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 08:39 PM2019-05-30T20:39:24+5:302019-05-30T20:40:16+5:30

अनेक वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, मतदारसंघात रस्त्याचा मोठा अनुशेष तयार झाला आहे, हा अनुशेष भरून काढणे सुरू आहे, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव-खेडी समृद्ध व स्वयंपूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार समीर कुणावार यांनी दिली.

We will make every village prosperous | प्रत्येक गाव समृद्ध बनवणार

प्रत्येक गाव समृद्ध बनवणार

Next
ठळक मुद्देसमीर कुणावार : रस्त्यांनी जोडली जाणार विविध खेडी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : अनेक वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, मतदारसंघात रस्त्याचा मोठा अनुशेष तयार झाला आहे, हा अनुशेष भरून काढणे सुरू आहे, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव-खेडी समृद्ध व स्वयंपूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार समीर कुणावार यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मतदारसंघातील विविध गावात विकासकामांच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटक जिल्हा परिषदचे अध्यक्ष नितीन मडावी होते. पंचायत समिती सभापती गंगाधरराव कोल्हे, भाजप नेते किशोर दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती. आजही अनेक गावे रस्त्यापासून वंचित आहेत, येणाऱ्या काळात रस्त्याचा एकही अनुशेष राहणार नाही, असा विश्वास आमदार कुणावार यांनी व्यक्त केला. गावात विकासाबाबत कोणतीही समस्या असेल ती सोडविण्यासाठी मी सदैव तयार आहे. आपण निसंकोच संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. जनता सवोर्तोपरी आहे या भावनेतून आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात विकासाची कामे केली जात आहे, येत्या काळात हा मतदार संघ विकासाच्या बाबतीत आदर्श ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत उबदा ते मांगली रस्ता १ कोटी १७ लक्ष, लोणार निंभा रस्ता २ कोटी १७ लाख, मेंढुला येथील रस्ता १ कोटी ८ लाख, खुनी ते सिंदी रस्ता ३ कोटी ७२ लाख, लसणपूर ते बर्फा ७० लाख, हरणखुरी येथील रस्ता ७४ लाख ७३ हजार, गिरड धामणगाव रस्ता १ कोटी २१ लाख, येनोरा-चिकमोह रस्ता १ कोटी ७६ लाख, बुरकोनी ते सावंगी ७५ लाख, कुंभी ते सातेफळ ते मानोरा ५४ लाख, पिंपळगाव ते वालदूर रस्ता १ कोटी ८६ लाख, सास्ती ते हडस्ती ५० लाख ८८ हजार, शेकापूर बाई ते सेलू रस्ता २ कोटी ३७ लाख, दहेगाव ते चिंचोली २ कोटी ७० लाख आणि हिवरा (सेलू) रस्ता ६३ लाख रुपयांच्या रस्ता बांधकामांचा प्रारंभ करण्यात आला.

Web Title: We will make every village prosperous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.