पुलगाव शहराला झुकते माप देवून स्मार्ट सिटी बनवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:55 PM2018-09-01T23:55:35+5:302018-09-01T23:56:50+5:30

आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात विविध योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करीत आहे.

We will make Pulgaon city a tilt and a smart city | पुलगाव शहराला झुकते माप देवून स्मार्ट सिटी बनवू

पुलगाव शहराला झुकते माप देवून स्मार्ट सिटी बनवू

Next
ठळक मुद्देरणजीत पाटील : २० महिन्यांतील कामांचा शुभारंभ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : आम्ही जनतेवर विश्वास ठेवतो. विश्वास हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. जनतेची आमच्यावर विश्वास ठेवला राज्यात व केंद्रात आम्हाला सत्ता दिली म्हणूनच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात विविध योजना कार्यान्वीत करून त्याची अंमलबजावणी करीत आहे. पुलगाव येथील नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकून येथील सत्ता दिल्यास आम्ही पुलगाव शहराला झुकते माप देत या शहराला स्मार्ट सिटी बनऊ, असे आश्वासन राज्याचे नगर विकास निधी, न्याय कौशल्यविकास गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.
स्थानीय नगर परिषदेने मागील २० महिन्यात केलेल्या विकास कामाचा शुभारंभ व नवीन कामांचा श्रीगणेशा ना. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शीतल गाते तर प्रमुख अतिथी म्हणून खा. रामदास तडस, आ. डॉ. रामदास आंबटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प.चे माजी सभापती मिलिंद भेंडे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, महाराष्ट्र ओबीसी मंडळाने सरचिटणीस संजय गाते, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा सचिव नितीन बडगे, कपील शुक्ला यांची उपस्थिती होती.
खा. तडस म्हणाले, नगर परिषद म्हणजे स्थानिक विकासाचा रथ आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे या रथाची चाके व त्यांच्यातील कल्पक विचार हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या रथाचा सारथी असतो. या सर्वांचा योग्य समन्वय असला तरच शहर विकासाचा रथ व्यवस्थित चालतो. मागील सहा दशकात या भागात काही अपवाद वगळता काँग्रेसची सत्ता राहिली. मात्र, या काळात शहराचा विकास करण्याऐवजी आपलाच विकास केल्या गेल्याची बोचरी टिका खा. तडस यांनी विरोधकांवर केली.
यंदा पुलगाव येथील नागरिकांनी या नगर परिषदेवर भाजपाला सत्ता दिली. म्हणून आम्ही विकासाचा केंद्र हे गाव ठरविले. या शहराला सर्व बाजूने राष्ट्रीय महामार्गाने जोडण्याचा, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात या शहराचा नावलौकि व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. पुलगाव, नाचणगाव या मार्गाचे चौपदरीकरणाची मागणीही ना. पाटील यांच्याकडे खा. तडस यांनी केली. याप्रसंगी आ. डॉ. रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनीही मार्गदर्शन केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव
कार्यक्रमादम्यान नगर परिषदेच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर मान्यवरांच्या हस्ते पुलगाव शहराच्या विकास कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल नगरसेविका मतता बडगे, नितीन बडगे व मुख्याध्यापक विठ्ठल वानखेडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्तींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: We will make Pulgaon city a tilt and a smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.