क्षयरोगाबाबत सप्ताहात जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:45 PM2018-04-03T23:45:44+5:302018-04-03T23:45:44+5:30
उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्था, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था सावंगी (मेघे), ग्रामीण रुग्णालय सेलू व सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन सप्ताह येथे साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्था, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था सावंगी (मेघे), ग्रामीण रुग्णालय सेलू व सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन सप्ताह येथे साजरा करण्यात आला. यात क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली. यासाठी अंगणवाडी क्र. ५५ येथे कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे तर अतिथी म्हणून न.पं. उपाध्यक्ष चुडामन हांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान प्रजापती, अंकुश वाके, डॉ. साहिल वाघ, संजय ठोके, नाबार्डचे डॉ. निखील धांदे, सामूदायिक औषधी विभाग सावंगीच्या डॉ. ईशांता आदी उपस्थित होते. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त महिलांना आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक क्षयरोग दिन सप्ताहाचे औचित्य साधून नाबार्डच्या बचतगटातील महिला, नाबार्डचे कार्यकर्ते यांचा अभ्यूदय मेघे, चुडाम हांडे, संजय ठोके, डॉ. धांदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थित महिलांना दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था सावंगी (मेघे), ग्रामीण प्रशिक्षण येथील डॉक्टरांच्या पथकाने टीबीबाबत मार्गदर्शन केले. शिवाय महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महिलांची तपासणी करण्यात आली. यातील काहींना तपासण्या व उपचारास्तव आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवेसाठी पाठविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश वाके यांनी केले. संचालन दिपाली खडगी यांनी केले तर आभार ज्योत्सना पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विनोद उरकुडे, रवींद्र रोकडे, ज्योती सुर्वे, रेखा भगत, आरती वैद्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, उत्कर्षा जनकल्याण शिक्षण संस्थेचे कर्मचारी आदींनी सहकार्य केले.