आठवडी बाजार भरतो रस्त्यावर

By admin | Published: May 27, 2017 12:34 AM2017-05-27T00:34:56+5:302017-05-27T00:34:56+5:30

प्रत्येक मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. पंचक्रोशीतील शेतकरी-शेतमजूर येथे विविध साहित्य खरेदीसाठी येतात;

Weekly market fills the streets | आठवडी बाजार भरतो रस्त्यावर

आठवडी बाजार भरतो रस्त्यावर

Next

नेहमीच होते वाहतुकीची कोंडी : दुर्गंधीचा नागरिकांना सोसावा लागतो त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : प्रत्येक मंगळवारी येथे आठवडी बाजार भरतो. पंचक्रोशीतील शेतकरी-शेतमजूर येथे विविध साहित्य खरेदीसाठी येतात; पण काही छोटे व्यावसायिक थेट वर्धा-नागपूर मार्गावरील जुन्यापुलाजवळ दुकाने थाटत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होते. कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्या जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
ग्रा.पं. असताना बाजार विकास योजनेंतर्गत दुकानासाठी ओटे बणविण्यात आले. पण, काही छोटे व्यावसायिक मुख्य रस्त्यावर बसत असल्याने वाहतूक खोळंबते. बाजार संपल्यावर सडका भाजीपाला रस्त्यावर टाकल्या जातो. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

विनाकठड्याच्या पुलामुळे अपघाताची भीती
आठवडी बाजार येथे रस्त्यावर भरतो. तेथे बोरनदीवरील जुना पुल आहे. त्याला सुरक्षा कठडे नाही. गर्दी पुलापर्यंत असते व लोकांची ये-जा याच पुलावरुन असल्याने अपघाताची भीती बळावत आहे. आता आठवडी बाजारापेक्षाही मोठा जुन्या पुलावर भरू लागला आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता योग्य कार्यवाहीची गरज आहे.

नियमांना डावलून वसूली सुरू
आठवडी बाजार कर वसूलीचा ठेका देण्यात आला आहे. बाजारात बसणाऱ्या दुकानदाराकडून कर घेणे क्रमप्राप्त असताना मेडिकल चौकातही त्या दिवशी छोट्या व्यावसायिकांकडून कर वसूल केल्या जात असल्याची तक्रार आहे. पण नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
नगरपंचायतीद्वारे या बाजाराचा कर वसुल करण्याचा वार्षिक ठेका दिल्या जातो. कर वसूल करणारे अरेरावी करीत मनमर्जीने कर वसूल करून दमदाटी करीत असल्याचे छोटे व्यावसायिक सांगतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

Web Title: Weekly market fills the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.