तन्जीम-ए-गौसियातर्फे तमाम धर्मगुरूंचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 09:58 PM2018-11-26T21:58:48+5:302018-11-26T21:59:01+5:30
मुस्लिम समाजाचे धर्म प्रसारक हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा उत्सव मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगात साजरा केला जातो. वर्धा शहरात मुस्लिम बांधवातर्फे ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा सण रॅली काढून उत्साहाने साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुस्लिम समाजाचे धर्म प्रसारक हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा उत्सव मोठ्या उत्साहाने संपूर्ण जगात साजरा केला जातो. वर्धा शहरात मुस्लिम बांधवातर्फे ‘जश्न-ए-ईद मिलादुन्नबी’ हा सण रॅली काढून उत्साहाने साजरा करण्यात आला.
वर्धा जिल्ह्याची प्रमुख जामा मस्जिद येथून शहरातील सर्व मस्जिदाकडून छोट्या रॅली सोबत पंैगबर यांचे नारे लावून जामा मस्जिद जवळ सकाळी ९ वाजता पोहोचले. स्टेशन फैलच्या नुरी मस्जिदचे धर्मगुरू, नगीना मस्जिदचे धर्म गुरू, जाकीर हुसैन कॉलनी मस्जिदचे धर्मगुरू, टीपू सुलतान नगर मस्जिदचे धर्मगुरू, आनंद नगर मस्जिदचे धर्मगुरू आदी सर्वधर्म गुरूंचे जामा मस्जिद कमेटीतर्फे फुलांच्या हार घालून स्वागत करण्यात आले. रॅलीमध्ये समाविष्ट सर्व धर्म गुरूचे स्वागत तन्जीम-ए-गौसिया तर्फे करण्यात आले.
रॅली जामा मस्जिद येथून पुढे टिळक भाजीबाजारपासून सराफा लाईन, अंबिका चौक, दुर्गा टॉकीज पासून बस स्टॅँड, बजाज चौक ते पोलीस स्टेशनच्या समोरून सोशालिस्ट चौकापासून गणेश हॉटेलपासून महादेवपुरा पासून जामा मस्जिद जवळ दुपारी १.१५ ला रॅली पोहोचली. रॅलीमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी भाग घेतला. रॅलीमध्ये मोटर गाड्यांवर नारे देण्यात आले व धार्मिक नात शरीफ वाचण्यात आली. या मोठ्या रॅलीचे व समाविष्ट धर्मगुरूंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
रॅलीमध्ये तन्जीम-ए-गौसियाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल खालीक नुरी, सचिव शोऐब अहेमद कन्नौजी, सैय्यद रशिद अली , सामाजिक कार्यकर्ता दिलदार बेग उर्फ समीर, जामा मस्जिद कमेटीचे सचिव सैय्यद आसिफ अली, सहसचिव जैनुल आबेदीन, लईक अहेमद फारूकी, अब्दुर्रब, मौलाना शरफुद्दीन रिज्वी, अर्शि मलिक शेख, बाबा कन्नौजी, स्टेशन फैलची नुरी मस्जिदचे धर्मगुरू व हाफिज, अफजल खान, हाजी शाकीर जिज्वी, साबिर तुरक, गौस मोहम्मद, शेख मोहम्मद शफी, हाजी शेख अहेमद, अमानुल्ला खान, अब्दुल हनिफ, अनिस खान, हाजी शकील तुराब, शेख बशीर, शब्बीर खॉँ, शेख मतीन उर्फ बब्लू आदी प्रामुख्याने उपस्थित होते.