काश्मीर ते कन्याकुमारी किसान यात्रेचे हिंगणघाट येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:11 PM2018-08-12T22:11:05+5:302018-08-12T22:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण झाले. किसान यात्रा रात्री ८ वाजता नंदोरी चौक हिंगणघाट येथे पोहचली. विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे ढोल ताशासहीत स्वागत केले.
या स्वागताला विराचे पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे, गिरीधर राठी, प्रदीप नागपूरकर, राजेंद्र पाटील, शेतकरी नेते दिनेश वाघ, महेश माकडे, भारत पाटील, जयंत धोटे, बंटी रघाटाटे, अजय मुळे, रोहीत राऊत, गौरव खिराळे, गोकुल पाटील व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत सहभागी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली.
शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. सर्व शेतमालाला आधारभूत किंमत एमएसपी सी २ अधिक ५० जाहीर झाली पाहिजे. डॉ. स्वामीनाथ आयोग लागू झाला पाहिजे तो पर्यंत हा लढा सुरु राहील, असे आवाहन सभेतील सहभागी शेतकरी नेत्यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला केले. या किसान अधिकार यात्रेत अभिमन्यु कोहर यांनी आतापर्यंतच्या एकाही सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही. सर्वच सरकारने शेतकºयांची फसवणूक केली. गुरूनामसिंह चंदूरी (हरियाना) यांनी शेतकऱ्यांनी आपला लढा तीव्र करावा. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही, असे सांगितले. जगजीत सिंह (पंजाब) यांनी विदर्भात झालेल्या शेतकºयांच्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या त्या हत्या आहे, कारण आत्महत्या या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालेल्या आहे असे सांगितले. हामीद मलीक (काश्मिर कुपवाडा), सुरेश खोथ (हरियाना), तामीळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांचे शेतकरी नेते या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या सभेचे प्रास्ताविक विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष तथा पूर्व विदर्भ प्रमुख अनिल जवादे यांनी केले. शेतकºयांच्या आत्महत्या नंतर स्वामीनाथन आयोग गठीत करण्यात आला असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन गोपाल मांडवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव पडवे यांनी केले. या सभेला मंचावर गिरीधर राठी, प्राचार्य आर. के. पाटील, माजी प्राचार्य भारत पाटील, उपप्राचार्य गुडधे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवतळे, उपमुख्याध्यापक राऊत, पर्यवेक्षक वाघ, पडवे, बन्सोड, राजु चंदनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेला हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.