तीन कोटींतून होणार सुसज्ज बसस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:36 PM2018-04-09T23:36:14+5:302018-04-09T23:36:14+5:30
येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : येथील बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. इमारत कधी कोसळेल याचा नेम नव्हता. याबाबत अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर देवळीला नवीन बसस्थानक मिळत आहे. तीन कोटींतून देवळीचे नवीन सुसज्ज बसस्थानक निर्माण होत आहे. या इमारतीच्या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला.
अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, न.प. अध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता बकाणे व महामंडळाचे वर्धा विभाग नियंत्रक राजेश अडोकार आदी यांची उपस्थित होते.
याप्रसंगी खा. तडस म्हणाले की, संघर्षमय जीवनात यापूर्वी विद्यार्थी व युवकांचे नेतृत्व करताना देवळीचा बस थांबा व सुविधांसाठी अनेक आंदोलने केली. कारागृहात गेला; पण आज या विभागाचा खासदार म्हणून तीन कोटींतून तयार होणाºया अद्यावत नवीन बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. यासाठी राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी सहकार्य केले. ४० वर्षांपूर्वीचे हे बसस्थानक अत्यंत जीर्ण झाले होते. कधीही पडून अपघात होण्याची शक्यता होती. या सर्व बाबींची जाण ठेवून परिवहन मंत्र्यांनी पुढकार घेतला. देशस्तरावर या महामंडळाचे मोठे नाव आहे. शिवशाही बसद्वारे महामंडळाने आधुनिकरणाचा मार्ग स्वीकारला; पण या शिवशाही बसला मर्यादित न ठेवता त्याचा व्यापक उपयोग करून आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे मतही खा. तडस यांनी व्यक्त केले. देवळी व इतर महत्त्वाच्या ठिकाणी शिवशाही बसचा थांबा द्यावा. महामंडळाच्या कर्मचाºयांना वेतनवाढ देत त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
नवीन वास्तूचा शिलान्यास खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागतगीत संकेत बाभळे यांनी सादर केले. संचालन अरविंद बाभळे यांनी केले तर आभार विभागीय वाहतूक अधिकारी स्मीता सुतवणे यांनी मानले. कार्यक्रमाला न.प. सदस्य नंदू वैद्य, संगीता तराळे, मारोती मरघाडे, अब्दुल नईम, प्रकाश कारोटकर, माया वडेकार, डॉ. श्रावण साखरकर, शरद आदमने, सुरेश तायवाडे, माला लाडेकर, नरेश पाटील, सुधाकर देवपुजारी, शीतल गौंड, कर्मचारी व नागरिक हजर होते.
आठ फलाट, तीन विश्रांतीगृह व पोलीस चौकी
नवीन बसस्थानकामध्ये आठ फलाट, तीन विश्रांतीगृह, मिटींग हॉल, गार्डन, स्रॅक बार, पोलीस चौकी, कॅबीन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे राहणार आहे. परिसराचे सिमेंटीकरण करण्यात येणार असून एक वर्षात हे बांधकाम पूर्ण होईल, असे विभाग नियंत्रक अडोकार यांनी सांगितले.