गव्हाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:31 AM2018-03-22T00:31:28+5:302018-03-22T00:31:28+5:30

परिसरात रोहित्र बसविण्यासाठी महापारेषणद्वारे होत असलेल्या कामादरम्यान थेट ट्रॅक्टर उभ्या पिकातून चालविण्यात आला.

Wheat Damage | गव्हाचे नुकसान

गव्हाचे नुकसान

Next
ठळक मुद्देमहापारेषणची मनमर्जी : शेतकऱ्याला फटका

ऑनलाईन लोकमत
चिकणी (जामणी) : परिसरात रोहित्र बसविण्यासाठी महापारेषणद्वारे होत असलेल्या कामादरम्यान थेट ट्रॅक्टर उभ्या पिकातून चालविण्यात आला. त्यामुळे उभ्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असून याचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
चिकणी शिवारामध्ये विजय देशमुख यांच्या शेतात नव्यानेच रोहित्र बसविले जात आहे. यासाठी बºयाच ेशेतकऱ्यांच्या शेतात खांब उभे करण्यात आले; पण महापारेषण कंपनीकडून सदर शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता हे काम पूर्णत्वास नेल्या जात आहे. रोहित्र बसवित असलेल्या शेताला लागून मोरेश्वर पारोदे यांचे शेत आहे. यांच्या शेतात गव्हाचे पीक उभे असताना सवंगणीला आलेल्या पिकातून थेट ट्रॅक्टर चालवून पिकाचे नुकसान करण्यात आले. खांब आणण्यासाठी ट्रॅक्टर येथे शेतातून टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
खांब आणण्यासाठी उभ्या गव्हाच्या पिकातून ट्रॅक्टर चालविल्यामुळे सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: Wheat Damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.