१२.७४ लाख खड्ड्यांत रोपटे केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:09 AM2018-07-14T00:09:59+5:302018-07-14T00:10:27+5:30
सुंदर व हरित वर्धा पर्यायानेच हरित महाराष्ट्र हा हेतू केंद्रस्थानी ठेवून यंदा तिसऱ्यांदा जिल्ह्यासह राज्यात वृक्ष लागवड उपक्रम राबविल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुंदर व हरित वर्धा पर्यायानेच हरित महाराष्ट्र हा हेतू केंद्रस्थानी ठेवून यंदा तिसऱ्यांदा जिल्ह्यासह राज्यात वृक्ष लागवड उपक्रम राबविल्या जात आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी जून महिन्यात अनेक ठिकाणी खड्डे खोदल्यानंतर १ जुलैपासून सदर खड्ड्यांमध्ये रोपटी लावली जात आहेत. गत अकरा दिवसांमध्ये केवळ १२.२५ लाख रोपटी जिल्ह्यात लावण्यात आली असून १२.७४ लाख खड्ड्यांना रोपट्यांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील विविध विभाग हरित वर्धेच्या उद्देशाकडे पाठ दाखवित असल्याने वरिष्ठांनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
वन व अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्त्व आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जात आहे. १३ कोटी वृक्ष लागवडीचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्याला २६ लाख रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जून महिन्यात वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील विविध विभागाकडून ठिकठिकाणी खड्डे खोदल्यानंतर १ जुलैपासून त्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली जात आहे. जुलैच्या दुसºया आठवड्यापर्यंत वृक्ष लागवडीचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण होईल असा अंदाज वन विभागासह जिल्हा प्रशासनाला होता; पण ११ जुलैपर्यंत प्रत्यक्षात १२ लाख २५ हजार ६१५ रोपटे लावण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याला प्राप्त उद्दीष्ट वेळीच पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध विभाग पाहिजे तसे सहकार्य करीत नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
वृक्षारोपणात ग्रा.पं. व न.प.सह कृषी विभाग मागेच
जिल्ह्यातील कृषी विभागाला ३ लाख १२ हजार ६२५, ग्रामपंचायतींना ६ लाख २९ हजार ८८० तर नगरपंचायत तसेच नगर पालिकांना २० हजार ६७५ रोपटे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात आतापर्यंत कृषी विभागाने केवळ २ हजार ४९३, ग्रामपंचायतींना २ हजार ७६४ तर नगरपंचायत तसेच नगर पालिकांनी केवळ ७५ रोपटे लावल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे सदर विभाग जिल्ह्यात वृक्ष लागवडीत मागेच असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
केवळ एकच व्हिडीओ केला अपलोड
ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे सर्वेक्षण केले जात आहे. सदर सर्वेक्षण करताना काही छायाचित्रे टिपत जास्तीत जास्त एक मिनीटांचा व्हिडीओ तयार करून तो राज्य शासनाने वृक्ष लागवड उपक्रमासाठी तयार केलेल्या राज्य शासनाच्या वेबसाईडवर अपलोड करणे क्रमप्राप्त आहे. असे असले तरी गत अकरा दिवसांच्या कालावधीत केवळ एकच व्हिडीओ सदर वेबसाईडवर वर्धा जिल्हा प्रशासनाने अपलोड केल्याचे सांगण्यात येते.
ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या वृक्षरोपणाचा सर्वे करून त्याची माहिती वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.