कृत्रिम पावसाचा प्रस्तावावर प्रत्यक्ष कृती केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:33 PM2019-07-24T23:33:25+5:302019-07-24T23:34:22+5:30

अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे.

When is the actual action on the artificial rain proposal? | कृत्रिम पावसाचा प्रस्तावावर प्रत्यक्ष कृती केव्हा?

कृत्रिम पावसाचा प्रस्तावावर प्रत्यक्ष कृती केव्हा?

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष : पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अत्यल्प पावसामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक जलाशय कोरडेच आहेत. अशातच पुढेही पाऊस न आल्यास वर्धा जिल्ह्यात पाणीबाणीच निर्माण होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा विनंती प्रस्ताव १५ जुलैला शासनाला पाठविला आहे. परंतु, अद्यापही त्यावर प्रत्यक्ष कृती झाली नसल्याचे सांगण्यात येते. गुरूवारी पालमंत्री चंद्रशेखर बावणकुळे हे वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर असून त्यांनी हा विषय मार्गी लावावा अशी मागणी वर्धेकरांची असून ते आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून सदर विषय मार्गी लावण्यासाठी थेट मुंबई दरबारी संवाद साधतील काय, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे एकूण ११ जलाशय तर २० लघु जलाशय आहेत. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच लघु जलाशयांनी तळ गाठला. तर मे महिन्यात अर्धेअधीक मोठे व मध्यम जलाशय मृत जलसाठ्यावर आले. तर सध्यास्थितीत दमदार पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच जलाशय कोरडे आहेत. भविष्यातही मान्सून सक्रीय राहण्याच्या कालावधीत दमदार पाऊस न झाल्यास वर्धेत पाणीबाणीच निर्माण होणार आहे. अशातच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार १७९ पशुधन आणि १३ लाख ७७७ लोकसंख्येचा आणि अंकुरलेल्या पिकांचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील जलाशयांच्या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, असा प्रस्ताव तयार केला.
शिवाय तो महाराष्ट्र शासनाच्या मदत व पूनर्वसन विभागाच्या सचिवांकडे १५ जुलैला पाठविला आहे. परंतु, सुमारे नऊ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर अद्याप कुठलाही विचार झालेला नसल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
मान्सून सक्रीय राहण्याचा जून आणि जुलै हाच महत्त्वपूर्ण महिना असून भविष्यातील धोके आणि नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची सध्या नितांत गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनीही हा विषय गुरूवारी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, असे ‘लोक’मत आहे.

दमदार पावसाची शक्यता नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज
रुसलेल्या वरुणराजाने वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, शासकीय कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर टाकली आहे. दमदार पाऊसाची प्रतीक्षा सर्वांनाच असली तरी २४ ते २८ जुलैपर्यंत वर्धा जिल्ह्यात दमदार पाऊस न होण्याचा अंदाज हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. तशा सूचनाही वर्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडून बाळगली जातेय कमालीची गुप्तता
वर्धा जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीचा विनंती प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला असला तरी जिल्हा प्रशासनातीलच निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून सदरची संपूर्ण माहिती कुणाला मिळू नये म्हणून कलालीची गुप्तता बाळगली जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांकडूनच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: When is the actual action on the artificial rain proposal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.