आम्हाला पाणी मिळणार तरी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 09:52 PM2018-12-04T21:52:03+5:302018-12-04T21:52:55+5:30

निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.

When do we get water? | आम्हाला पाणी मिळणार तरी केव्हा?

आम्हाला पाणी मिळणार तरी केव्हा?

Next
ठळक मुद्देपाटचरींना झुडपांचा विळखा : पाण्याकरिता आॅईल इंजिनची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : निम्न वर्धा प्रकल्पाचे दुसरे पाणी सोडण्यात आले आहेत. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात आहेत. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नसल्यामुळे चणा पिकाला पाणी द्यायचे कसे या विंवचनेत शेतकरी सापडला आहेत. तर काही शेतकरी आॅईल इंजिनने पाणी देण्यासाठी जुळवाजुळव करीत असल्याचे दिसून येते. तसेच पाटचऱ्या झुडपानी माखल्या आहेत. पाटचºयांची साफसफाई करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे ज्यांच्या शेताजवळून कालवा गेला आहेत. त्यांनाच पाण्याकरिता आटापीटा करावा लागत असल्याचे वास्तव आहेत. चिकणी शिवारात नितीन अतकरे यांच्या शेतातून मोठा कॅनल गेला आहेत व याच कॅनलच्या पाटचºया गजानन राऊत, संजय अतकरे, नितीन भोयर, बळवंत डायरे, प्रदीप भोयर, सुभाष कन्नाके, सोनबा डायरे, गुलाब डायरे, महादेव डायरे यांच्या शेताजवळून गेल्या आहेत. परंतु सदर कॅनलचे पाणी यांच्या शेतापर्यंत पोहचतच नाही. सदर शेतकरी पाण्याकरिता जिवाचा आटापीटा करीत आहेत. तसेच आॅईल इंजिनने पाणी देणे खर्चाला न परवडणारे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. आमचे शेत वरच्या भागाला असल्यामुळे पाणी येत नाही. परंतु पाटचºया खोल केल्यात तरा आम्हाला पण पाणी मिळू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या परंतु शासनाच्या पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती सिंचन अडचणीत आले आहे. यांचा परिणाम उत्पादनावर होत आहे.लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सर्वच प्रकल्पाची व्यथा सारखीच
वर्धा जिल्ह्यात बोर हा सर्वात जुना प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाटसºया या झाडे व झुडपांनी वेढलेल्या आहेत.त्यामुळे शेती सिंचनास अडचण निर्माण झाली आहे. अशीच परिस्थती ही आष्टी तालुक्यातील पाटसऱ्यांची आहे. निम्म वर्धा प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणी हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. पाटबंधारे विभागाने समस्या सोडवावी.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची समस्या सांगीतली व ते म्हणाले दुसऱ्या पाण्यापर्यंत तुमची समस्या मार्गी लागेल व तुम्हाला पाणी मिळेल परंतु अद्यापही समस्या कायम आहेत. त्वरीत पाटचऱ्या खोल कराव्यात व आम्हाला पाणी द्यावेत अशी आमची मागणी आहेत.
- जगदीश डायरे, शेतकरी चिकणी.

Web Title: When do we get water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.