बोंडअळीचे अनुदान देता तरी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:52 PM2018-11-24T23:52:07+5:302018-11-24T23:52:43+5:30
मागील वर्षी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. काहींना दोन टप्प्यात शासकीय मदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेकांना प्रत्यक्षात जाहीर झालेली शासकीय मदत मिळालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : मागील वर्षी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. काहींना दोन टप्प्यात शासकीय मदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेकांना प्रत्यक्षात जाहीर झालेली शासकीय मदत मिळालेली नाही. शासकीय मदत बँक खात्यात जमा झाले की नाही यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असून बोंडअळीचे नुकसान देता तरी केव्हा असा संतप्त सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
पांढर सोन अशी कापसाची ओळख. परंतु, याच पांढºया सोन्यावर मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतकेच नव्हे तर उत्पादनातही मोठी घट आली होती. हवालदिल झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. दोन टप्प्यातील १६ कोटींचा वाटप सुद्धा झाला. परंतु, उर्वरित ८ कोटी ३१ लाख रूपयाचा तिसरा टप्पा अद्यापही कार्यालयातच पडून आहेत. तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता करण्यात आला नाही. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चालढकलच केली जात असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चिकणी, पढेगाव, निमगाव, सेलसूरा, वडद आदी गावांमधील नुकसानग्रस्त शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. शासनाकडून संबंधित विभागाला १५ दिवसापूर्वीच रक्कम आली आहे; पण अधिकाऱ्याच्या दुर्लक्षी धोरणामुळे शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचली नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, आम्हाला आताही बँकेतच चकरा माराव्यास लागत आहेत. १५-१६ नोव्हेंबरपर्यंत आमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते; पण अद्यापही शासकीय अनुदान बँक खात्यात जमा झाले नाही.
- मोरेश्वर पारोदे, शेतकरी, चिकणी (जामणी).
आम्ही पूर्ण शेतकºयांच्या बँक खात्याची माहिती आणि क्रमांक वरिष्ठांना पाठविले आहेत. या महिन्यात अधिक सुट्ट्या आल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत रक्कम पोहचायला विलंब होत असावा.
- आशीष सहारे, तलाठी, चिकणी (जामणी).