आष्टी-किन्हाळा रस्त्याचे भाग्य उजळणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:24 PM2017-12-30T23:24:00+5:302017-12-30T23:24:16+5:30
आष्टी - किन्हाळा हा ६ किमीचा रस्ता गत अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे अर्धे काम काही वर्षांपूर्वी झाले असले तरी उर्वरीत कामासाठी निधीच नसल्याचे सांगितले जात असल्याने सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आष्टी - किन्हाळा हा ६ किमीचा रस्ता गत अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे अर्धे काम काही वर्षांपूर्वी झाले असले तरी उर्वरीत कामासाठी निधीच नसल्याचे सांगितले जात असल्याने सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा सवाल परिसरातील नागरिकांसह ग्रामस्थांकडून उपस्थित केल्या जात आहे. उल्लेखनिय म्हणले ही समस्या निकाली निघावी म्हणून मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले होते.
आष्टी-किन्हाळा हा रस्ता जि. प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय डांबरीकरणाचे कामही दीड किमीपर्यंत काही वर्षापूर्वी झाले. आतापर्यंत त्यासाठी सुमारे ७६ लाख रूपये खर्च झाले आहे. उर्वरीत डांबरीकरणाच्या कामासाठी १ कोटी रूपये आवश्यक आहे;पण जि.प. बांधकाम विभागाला राज्य सरकारकडून पाहिजे तेवढा निधी येत नाही. त्यामुळे तुकडे पाडून अल्प निधीतच काम करावे लागते. सन २०१६-१७ मध्ये या रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये आले होते. त्यामधून खडीकरण करण्यात आले. रस्त्यावरून कॅनलचे पाणी वाहते त्याठिकाणी पुल मंजूर झाला नाही. त्यामुळे चिखलातुनच ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरचे भूपृष्ठ आवरण समतल नसल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करीत पुढील प्रवास करावा लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह या भागातील नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा या ठिकाणी नाही. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने ये-जा करावी लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी गजानन आंबेकर, दिनेश मानकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.