पांढरे सोने निकषात बसलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:12 PM2019-05-12T21:12:24+5:302019-05-12T21:12:46+5:30
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकरी ज्वारी, सोयाबीन, तूर आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. अनेक कपाशी उत्पादकांनी यंदा विम्याचे कवच घेतले होते. शिवाय काही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानही झाले. असे असले तरी विम्याचे कवच घेतलेल्या नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांचे झालेले नुकसान उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषात बसलेच नाही. परिणामी एकाही कपाशी उत्पादकाला झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने आर्थिक मदत दिलेली नाही.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा व्यवसाय तोट्यात आला आहे. अशातच प्रत्येक शेतकऱ्याने शेती करताना पीक विम्याचे कवच घ्यावे असे कृषी तज्ज्ञ सांगतात. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले होते. त्यापैकी उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावर जिल्ह्यातील ८१० नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या नुकसानभरपाई पोटी मिळणाऱ्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना बँक खात्यात लवकरच एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम वळती केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या आवाहनाला केंद्रस्थानी ठेऊन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यातील एकूण ३७ हजार २८८ शेतकऱ्यांनी पीक विम्याचे कवच घेतले. सदर शेतकºयांना १६८ कोटी ७७ लाख ९८ हजार ६९७ रुपयांपर्यंच्या नुकसानीचे कवच देण्यात आले होते. हंगामाच्या शेवटी कृषी विभागाच्या सर्वेक्षणाअंती उंबरठा उत्पन्ना पेक्षा कमी उत्पन्न या निकषाच्या आधारावर नुकसानग्रस्त ८१० शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. त्यांना एकूण ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
व्यक्तिगत नुकसानीचे नऊ अर्ज
खरीप हंगामात व्यक्तीगत नुकसान झाल्याच्या एकूण ९ तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी कृषी विभागाने पंचनामा करून विमा कंपनीकडे पाठविल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना नुकसानीपोटी मिळणारी रक्कम अद्यापही निश्चित झाली नसून लवकरच ही आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. यात देवळी व हिंगणघाट येथील नुकसानग्रांचा समावेश आहे.
लीड बँकेकडे वळती झाली रक्कम
ाुकसानग्रस्त ८१० शेतकºयांना नुकसानीपोटी द्यावयाची रक्कम विमा कंपनीने लीड बँकेकडे वळती केली आहे. लीड बँक आता ही रक्कम इतर बँकेकडे वळती करणार असून सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई पोटीची रक्कम टाकली जाणार आहे.
रबीत २,२०० शेतकऱ्यांनी घेतले विमा कवच
खरीप हंगामात ३७ हजार २८८ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. तर रबी हंगामात २ हजार २०० शेतकºयांनी पीक विम्याचे कवच घेतले होते.
उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या निकषावरून विमा कंपनीने ८१० शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाईपोटी ४२ लाख ९४ हजार ९७९ रुपये देण्याचे निश्चित केले आहे. शिवाय ही रक्कम लिड बँकेकडे वळती केली आहे.
- विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वर्धा.