मजुरांअभावी पांढरे सोन शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 09:55 PM2018-01-27T21:55:04+5:302018-01-27T21:55:42+5:30

गत वर्षी तूर व सोयाबीन पिकाने दगा दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

White gold in the field due to laborers | मजुरांअभावी पांढरे सोन शेतातच

मजुरांअभावी पांढरे सोन शेतातच

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता वाढली : स्व:खर्चाने करावी लागते मजुरांची ने-आण

आॅनलाईन लोकमत
चिकणी (जामणी) : गत वर्षी तूर व सोयाबीन पिकाने दगा दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु, सध्या कापूस वेचण्यासाठी वेळीच मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. अनेक शेतकऱ्यांना कापूस अद्यापही मजुरांअभावी शेतातच आहे. कापूस वेचणीसाठी जे मजूर उपलब्ध होत आहेत त्यांची ने-आण शेतकऱ्यांना स्व: खर्चाने करावी लागत आहे.
गत दोन वर्षांपासून नापिकी व निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागला. मागील वर्षी तूर उत्पादकांनाही बºयापैकी उत्पन्न न झाल्याने यंदाच्यावर्षी बहूतांश शेतकऱ्यांनी तूर पिकाकडे पाठ करीत कपाशीची लागवड केली. पीक बोंडावर आले असता बोंडअळीच्या प्रकोपाने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले. इतकेच नव्हे तर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातही घट झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येते. निसर्गाच्या लहरीपणाचा यंदाही फटका सहन करावा लागल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कापूस वेचणीसाठी मजूरच सहज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला मजूरही या ना त्या कारणाने वेठीस धरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जे शेतमजूर कापूस वेचणीच्या कामासाठी मिळत आहेत त्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्याला स्व:खर्चाने शेतात ने-आण करावी लागत आहे. त्यामुळे जादाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
करावी लागतेय भटकंती
गावातच कापूस वेचणीच्या कामासाठी सहज मजूर मिळत नसल्याने परिसरातील कापूस उत्पादकांना गावाबाहेरुन मजूर आणून कापूस वेचणीचे काम करावे लागत आहे. इतकेच नव्हे तर कापूस वेचणीच्या कामाकरिता मजुरांचा शोध घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकºयांना भटकंती करावी लागत आहे. कापूस उत्पादक शेतकºयांकडून परिसरातील गावांसह जिल्ह्याबाहेरील मजुरांकडून काम केले जात आहे. मजुरांअभावी डोकेदुकी वाढली आहे.

Web Title: White gold in the field due to laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.