पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:57 PM2018-12-29T23:57:54+5:302018-12-29T23:58:36+5:30

अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

White gold price still stabilized | पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

पांढऱ्या सोन्याचे भाव अद्यापही स्थिरावलेलेच

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी द्विधा मनस्थितीत : ठोस निर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना सातत्याने करावा लागत असलेला शेतकरी दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेतमालाला चांगला भाव मिळेल, ही आशा बाळगून असतो. यावर्षी तरी कापसाचे भाव वाढतील, अशी आशा सुरुवातीला होती, पण ५४०० वर भाव स्थिरावल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कापसाच्या भाववाढीची तो प्रतीक्षा करीत आहे.
कापूस खरेदीच्या मुहूर्ताला व्यापाऱ्यांनी ५८०० ते ९०० असा भाव दिल्याने कापूस ६००० च्या वर जाईल, अशी आशा होती, पण दिवाळीचा सण आणि कापसाची वेचणी एकाचवेळी आल्याने शेतकऱ्यांजवळ कापूस वेचणीची मजुरी देण्यासाठी पैशाची चणचण असल्याने मिळेल त्या भावात कापूस विकावा लागला. यावर्षी पाऊस वेळेवर आला नसल्याने तसेच शेतातील विहिरीला असलेली पाणीपातळी कमी झाल्याने कोरडवाहू तसेच बागायती शेतातील कपाशीचे पिकाचे उत्पादन घटले. अशा परिस्थितीत कापसाला भाव चांगला मिळेल, अशी आशा कापूस उत्पादक शेतकºयांना होती. अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांनासुद्धा शेतमालाला मिळणारा भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºयांवर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय नेते शेतमालाला भाव कमी मिळत असताना गप्प आहेत. त्यामुळे अस्मानी संकट आले तर ते मान्य, पण सुल्तानी संकट कायमच असल्याने आच्छे दिनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे कापूस वेचणीस मजूर मिळेना, कापूस वेचणी महागली, अशात भाव उतरत आहे. कापसाची प्रत चांगली नसल्याने भावात घसरण झाल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी कापसाचे पीक परवडणार नाही, तर युवा शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कापसाचे स्थिर भाव कापूस उत्पादकांच्या पथ्यावर पडत आहे. नवीन वर्षात तरी कापसाचे भाव वाढतील, ही आशा शेतकऱ्यांना असल्याने तूर्तास कापूस विक्री थांबविण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसत आहे. उत्पादन खर्चावर भाव हे मृगजळ ठरत असताना बोंडअळीच्या अनुदानासाठी शेतकरी बँकेच्या पायºया वर्षभरापासून झिजवत आहे. कर्जमाफीपासून शेतकरी अद्याप दूर असल्याने चर्चेतून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

राजकीय पुढारी मौन बाळगून
अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखविणाºयांना सद्यस्थितीत शेतमालाला मिळत असलेला भाव खरेच परवडणारा आहे का, याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करण्यात आली तर कारवाई करू, अशा वल्गना करणारे राजकीय पुढारी आज शेतमालाला कमी भाव मिळत असताना मौन बाळगून आहेत. कुणी वालीच नसल्याने दाद तरी कुणाकडे मागायची, असा पश्न शेतकरीवर्गातून उपस्थित केला जात आहे.

Web Title: White gold price still stabilized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस