वर्धा जिल्ह्यात प्रथमच आढळला पांढरा नाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:46 PM2018-03-21T12:46:47+5:302018-03-21T12:46:55+5:30

जिल्ह्यातील पिंपळा पुनर्वसन येथे दुर्मीळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांत काही वेळ खळबळ उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

The white snake found for the first time in Wardha district | वर्धा जिल्ह्यात प्रथमच आढळला पांढरा नाग

वर्धा जिल्ह्यात प्रथमच आढळला पांढरा नाग

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधी चंद्रपूर जिल्ह्यात आढळला होतातलाव परिसरात सोडून दिले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील पिंपळा पुनर्वसन येथे दुर्मीळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांत काही वेळ खळबळ उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
हा दुर्मिळ साप राहुल ठाकरे रा. पिंपळा पुनर्वसन यांच्या घराच्या परिसरात आढळला. हा साप नाग जातीचा असून तो विषारी व अतिशय वेगळा आहे. या आधी असा नाग एकदा चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आला होता, असे काही प्राणी मित्रांनी सांगितले. त्यानंतर त्याची नोंद आर्वी शहरात प्राणी मित्रांकडून घेण्यात आली आहे.
पिंपळा पुनर्वसन येथील रहिवासी राहुल ठाकरे यांच्याकडे हा साप आढळल्यावर त्यांनी सर्पमित्रांना सदर घटनेची माहिती दिली. सर्पमित्र तुषार साबळे, शुभम जगताप, आकाश ठाकरे, रितेश कटेल, मोनू मुला, संकेत वनस्कर, सुरज विरपचे, गिते यांनी घटनास्थळ गाठून या सापाला शिताफीने पकडले. या सापाच्या प्रकाराची वन विभागातर्फे नोंद घेण्यात आली आहे. सदर सापाला वनविभागाचे कर्मचारी कावळे, सावंत, कुकडे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांनी त्याला सारंगपुरी तलाव परिसरात सोडून जीवदान दिले असल्याचे सांगण्यात आले.

हा दुर्लभ लिमुसिसटिक साप आहे. तो विषारी साप आहे. कारण ‘एलबिनो’ प्रजातीच्या प्राण्यांचे डोळे गुलाबी असतात. चंद्रपूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या सापाची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर आता या सापाची नोंद आर्वीत घेण्यात आली आहे.
- शुभम जगताप प्राणी मित्र,आर्वी.

Web Title: The white snake found for the first time in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.