एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:32+5:30

दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. बँकेत जाऊन पैसे काढायचे कष्ट एटीएममुळे बऱ्यापैकी कमी झालेत.

Who is responsible for ATM security? | एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षा रक्षक नाहीच : मोकाट श्वानांची आश्रयस्थाने

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या संख्येने एटीएम आहेत. मात्र, एटीएममधील वातानुकूलित यंत्रे कित्येक महिन्यांपासून लॉकडाऊन असून सुरक्षा रक्षक नाहीत. स्वच्छतेचाही अनेक एटीएममध्ये मागमूस नाही. त्यामुळे एटीएमची सुरक्षा आणि देखभालीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. बँकेत जाऊन पैसे काढायचे कष्ट एटीएममुळे बऱ्यापैकी कमी झालेत. आणि बँकांमध्ये रांगा लागण्याचे प्रमाणही निम्म्यावर आले. संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचे एकूण २२५ एटीएम (आॅटोमेटेड टेलर मशीन) आहेत. पूर्वी सर्वच एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक कार्यरत होते. मात्र, आज बोटावर मोजण्याइतपत म्हणजे दोन-चार एटीएमवर सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती वातानुकूलित यंत्रांबाबतीत आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा फलक कित्येक एटीएमवर सातत्याने झळकत असतो. बंद वातानुकूलित यंत्रांमुळे एटीएम सुरळीत कार्य करीत नाही. विशेष म्हणजे, अनेक एटीएमची दारे सताड उघडी असतात. त्यामुळे विरळ भागातील एटीएम मोकाट श्वान, जनावरांचे आश्रयस्थाने झाल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत उघड झाले. महादेवपुरा परिसरातील एटीएममध्ये इंचभर धुळीचा थर साचलेला आहे. या एटीएमची कधी स्वच्छताच होत नसल्याचे दिसून येते.

एटीएममधील वातानुकूलित यंत्र बंद
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांमिळून एकूण २२५ एटीएम आहेत. यातील बोटावर मोजण्याइतक्याच एटीएममधील वातानुकूलित यंत्र सुरू आहेत. त्यामुळे सर्व्हर डाऊन व अन्यप्रकार नित्याचे झाले आहेत. या एटीएमची देखभाल करण्याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

Web Title: Who is responsible for ATM security?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम