कोल्हापूर (राव) मार्गावरील अवैध टोल वसुलीला अभय कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:00 AM2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:09+5:30
तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अडचण गेली नाही. परंतु, राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झाल्यावर हुस्रापूरजवळ टोलनाका सुरू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : बुटीबोरी ते तुळजापूर महामार्गावर सध्या हुस्रापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून टोलवसुलीचे काम सुरू आहे. मात्र, याच वसुली करणाऱ्या कंपनीच्यावतीने कोल्हापूर (राव) मार्गावरही नाकाबंदी करून अवैध पद्धतीने टोलवसुली सुरू आहे. या वसुलीला अभय कुणाचे? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून विचारला जात आहे.
तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अडचण गेली नाही. परंतु, राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण झाल्यावर हुस्रापूरजवळ टोलनाका सुरू झाला. असे असले तरी नोट नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून अवैध पद्धतीने नाकाबंदी करून टोल वसूली केली जात आहे. त्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची नियुक्तीही करण्यात आली आहे. ते बळजबरी वाहने थांबवून कोल्हापूर राव चौरस्ता परिसरात ये-जा करणाºयांकडून टोलच्या नावावर पैसे उकळत आहेत. ही पूर्णत: बेकायदेशीर व पठाणी पद्धतीचा अवलंब करून वसुली आहे. त्यामुळे अनेकदा वादही होत आहेत. कंपनीने ही पठाणी वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. या मार्गावर तुम्ही टोलवसुली कशी करू शकता असा सवाल या नागरिकांकडून केल्यावर अंगावर चाल केली जाते. शिवाय अश्लील शब्दाचा वापर करीत शिवीगाळही केली जात असल्याचे नागरिक सांगतात. एकूणच टोलच्या नावाखाली गुुंडप्रवृत्तीच्या या व्यक्तींकडून ये-जा करणाºयांना वेठीस धरले जात आहे. या संदर्भात विजयगोपालच्या सरपंच निलम बिन्नोड यांनी शासनाकडेही तक्रार केली आहे. ही बेकायदेशीर वसुली तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी या तक्रारीतून केली आहे. मागणीवर विचार न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.