कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रॅलीतून वन्य प्राणी रक्षणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:34 PM2017-10-06T23:34:21+5:302017-10-06T23:34:34+5:30

मानवी मनात वन्य प्राण्याविषयी असणारी भीती दूर व्हावी, त्यांच्यात वन्य प्राण्यांविषयी प्रेमाची भावना निर्माण होवून मानवाने वन्य प्राण्यांचे रक्षण करावे तसेच वृक्ष कटाई न करता वृक्षारोपण करून ....

Wildlife conservation message from the Rally of Arts and Science College | कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रॅलीतून वन्य प्राणी रक्षणाचा संदेश

कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रॅलीतून वन्य प्राणी रक्षणाचा संदेश

Next
ठळक मुद्देवीर पुरूष व वन्य प्राण्यांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : मानवी मनात वन्य प्राण्याविषयी असणारी भीती दूर व्हावी, त्यांच्यात वन्य प्राण्यांविषयी प्रेमाची भावना निर्माण होवून मानवाने वन्य प्राण्यांचे रक्षण करावे तसेच वृक्ष कटाई न करता वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन महत्त्वाचे आहे. या भावनेतून येथील कला व विज्ञान महाविद्यालय व इंडियन मिलिटरी स्कूल यांनी संयुक्तपणे वन्य प्राणी सप्ताहाचे औचित्य साधून भव्य रॅली काढून जनजागृती करून वन्य प्राण्यांचे संरक्षण करा, असा संदेश दिला.
येथील आर.के. हायस्कूलच्यावतीने आयोजित वन्यप्राणी सप्ताह कार्यक्रमात केंद्रीय दारूगोळा भांडाराचे ब्रिगेडिअर आय. गोल्डस्मिथ, सुरक्षा अधिकारी ए.एस. कुशवाह, नगराध्यक्ष शीतल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, देवळीच्या माजी नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश भोयर, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल वर्धा युनिटचे आशिष गोस्वामी, वसंत वंडलकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी इंडियन मिलिटरी स्कूलच्या भावी सैनिकांनी ब्रिगेडिअर आय. गोल्डस्थिम यांना मानवंदना दिली व त्यांनी या पथकाची पाहणी केली.
यानंतर या मान्यवरांनी या रॅलीला हिरवी झेंडी दिली. या रॅलीत वनातील वाघ सिंहाच्या प्रतिकृतीचा व वृक्ष संगोपनाचे चित्ररथ, वृक्षदिंडी, हिरवी साडी, डोक्यावर केशरी फेटा व हातात केशरी पताका घेवून अश्वस्वार विद्यार्थिनी, भजनी मंडळे इंडियन मिलिटरी स्कूलचे बँड पथक व सैनिकी पोषाखातील व हिरव्या गणवेशातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षिका, लेझीम पथक शहरवासीयांचे लक्ष वेधत होते. रॅलीने मार्गातील डॉ. आंबेडकर, शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करीत स्टेशन चौक, नगर परिषद आठवडी बाजार, भगतसिंग चौक, गांधी चौक मार्गे ही रॅली कॉलेजमध्ये परत आल्यावर रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीतील चित्र रथावरील छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, शहरवाशियाचे लक्ष वेधत होते. कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास हाडगे, इंडियन मिलिटरी स्कूलचे प्राचार्य रवीकिरण भोजने यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या कार्यक्रमात जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल, संजय गाते, सेंट जॉन हायस्कूलचे संचालक चंद्रशेखर इंगळे, माजी नगराध्यक्ष राजीव बतरा, वन विभागाचे बन्सोड, सहायक एस.आर. परडके उपस्थित होते. कार्यक्रमास प्रा.डॉ. मंदा तडस, प्रा.डॉ. संदीप हातेवार यांच्यासह प्राध्यापक कर्मचाºयांचे योगदान होते. रॅलीत पिपल्स फॉर अ‍ॅनिमल, इंडियन मिलिटरी स्कूल, स्व. भैय्यासाहेब भोयर, औद्योगिक संस्थेचा सहभाग होता.

Web Title: Wildlife conservation message from the Rally of Arts and Science College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.