वर्ध्यांचा पक्षी ठरणार ‘भारतीय निलपंख’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:57 PM2018-08-20T22:57:06+5:302018-08-20T22:57:29+5:30

वर्ध्यात विदर्भातून पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दीड महिना चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या अनोख्या निवडणुकीत पाच पक्षी उमेदवार रिंगणात होते.

Will 'bird of the natives' become 'Indian Nilpanch'? | वर्ध्यांचा पक्षी ठरणार ‘भारतीय निलपंख’?

वर्ध्यांचा पक्षी ठरणार ‘भारतीय निलपंख’?

googlenewsNext
ठळक मुद्देदीड महिन्यात ५८ हजार मतदारांनी बजावला अधिकार : निकालाकडे लक्ष

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्ध्यात विदर्भातून पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दीड महिना चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या अनोख्या निवडणुकीत पाच पक्षी उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ‘भारतीय निलपंख’ या पक्षाचेच पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. पर्यावरणाचे रक्षणकर्ते असलेल्या पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी बहार नेचर फाऊंडेशन व वर्धा न.प.च्यावतीने वर्धा शहरपक्ष्यांची निवडणूक घेतली आहे. या निवडणुकीत वर्धा शहराच्या आसपास वावरणाऱ्या तांबट, धीवर (पांढºया छातीचा), ठिपकेबाज पिंगळा, भारतीय निलपंख व कापशी घार या पाच पक्ष्यांना निवडणूक रिंंंगणात उतरविले. या उमेदवार पक्ष्यांना जास्तीत जास्त मतदान मिळावे म्हणून जोरदार प्रचार करण्यात आला. हा उपक्रम केवळ मतदानापुरता मर्यादित न ठेवता, या काळात विविध माध्यमांद्वारे परिसरातील पक्ष्यांबाबत जनजागृती करीत छायाचित्र प्रदर्शनी, चित्रफितीद्वारे सादरीकरण, मगन संग्रहालयाच्या भिंतीवर पाखरांची शाळा, माझा पक्षी माझे चित्र स्पर्धा, सायकल प्रचारयात्रा, उमेदवार एका मंचावर असे अनेक उपक्रम राबविले. त्याला वर्धेकरांनी भरभरुन दाद दिली. जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदान केले. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे असून या निवडणुकीत भारतीय निलपंख व धीवर यांच्यात होणार असली तरी बहुमत निलपंख पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.
तीन हजार मतदारांनी केले आॅनलाईन मतदान
वर्धा शहरपक्षी निवडणुकीत उमेदवार असलेल्या पाचही पक्ष्यांना मतदान करण्यासाठी आॅनलाईन आणि मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्यात आले. २३ जूनपासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रि येची १५ आॅगस्टला महामतदानाने सांगता झाली. या दीड महिन्याच्या कालावधीत तीन हजार मतदारांनी आॅनलाईन मतदान केले. तर जवळपास ५५ हजार मतदारांनी मतपत्रिकेव्दारे मतदान केले आहे.
बुधवारी निकाल
शहरपक्षी निवडणुकीचा निकाल बुधवार २२ आॅगस्टला जाहीर होणार आहे. स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात सकाळी ७ वाजतापासून या आगळ्यावेगळ्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक अतुल शर्मा, डॉ. गोपाल पालीवाल व डॉ. तारक काटे यांच्या उपस्थितीत पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया होणाार असून लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पर्यावरणवादी कार्यकर्ते भेट देणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी चितारलेल्या पक्षीचित्रांची प्रदर्शनीही सभागृहात लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सहा कि.मी.चा परिसर मतदान क्षेत्र
शहरालगतचा सहा किलो मीटरपर्यंतचा परिसर हा मतदान क्षेत्र होते. या मतदानात सावंगी, भूगांव, सेवाग्राम, येळाकेळी, पवनार येथील विविध शाळा, महाविद्यालय व पक्षीमित्रांनी मतदान केले. ही प्रक्रि या यशस्वीपणे राबविण्यासाठी उमेदवारांच्या अनेक प्रतिनिधींनी अविरत परिश्रम घेतले आहे.
पक्षीतज्ज्ञ चितमपल्ली करणार शहरपक्षाची घोषणा
मतमोजणी पूर्ण होताच प्रख्यात पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली वर्धा शहरपक्ष्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. निकालाची प्रत नगराध्यक्ष अतुल तराळे व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविली जाईल. या निवडणुकीतील विजेत्या शहरपक्ष्याचा पुतळा वर्धानगरीतील मुख्य चौकात स्थापन करण्यात येणार आहे.

Web Title: Will 'bird of the natives' become 'Indian Nilpanch'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.