जिल्ह्याच्या ३४ गावांतून जाणार समृद्धी महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:47 PM2019-03-13T21:47:40+5:302019-03-13T21:47:55+5:30

नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.

Will go to the 34 villages of the district, the Prosperity Highway | जिल्ह्याच्या ३४ गावांतून जाणार समृद्धी महामार्ग

जिल्ह्याच्या ३४ गावांतून जाणार समृद्धी महामार्ग

Next
ठळक मुद्देकामास प्रारंभ : खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर-मुंबई हा महाराष्ट्र समृध्दी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ३४ गावांमधून जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या खासगी व सरकारी जमिनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या समृद्धी महामार्गामुळे या गावातील शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत.
या महामार्गाचे कामही युध्द पातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागपूर-मुंबई दरम्यान ७२० कि.मी. लांबीच्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी सेलू, वर्धा, आर्वी या तीन तालुक्यातून जमीन अधिग्रहन करण्यात आली आहे. सेलू तालुक्यात सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) या गावातून शेतकऱ्यांची जमीन घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात २७७.७८२ हेक्टर खासगी जमीन तर २९.५४ हेक्टर सरकारी जमीन अशी एकूण ३०७.२२७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.
वर्धा तालुक्यात महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रज, झाडगाव, वाटोडा, धामणगाव, डोरली, लोनसावळी या दहा गावातून जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. २०६.१७२ हेक्टर आर खासगी जमीन तर ७१.७२ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. वर्धा तालुक्यात एकूण २७७.८९२ हेक्टर आर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे.
आर्वी तालुक्यात बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या आठ गावातील जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. यामध्ये ११६.२२७ हेक्टर आर खासगी जमीन तर २३.६६ हेक्टर आर सरकारी जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. आर्वी तालुक्यात एकूण १३९.६४७ हेक्टर आर जमीन अधिग्रहण झाली आहे. या मार्गावर सिंदी (रेल्वे) येथे ड्रायपोर्ट उभारला जाणार असून त्यांचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
८८ टक्के काम पूर्ण
या महामार्गासाठी सेलू तालुक्यात ८२.९५ टक्के जमिनीचे खरेदी खत करून घेण्यात आले आहे. तर वर्धा तालुक्यात ८१.८४ टक्के जमिनीचे खरेदी खत झाले आहे. आर्वी तालुक्यात ८९.१८ टक्के जमिनीचे खरेदी खत तयार करण्यात आले आहे. तीन तालुक्यात १४ टक्के जमीन अधिग्रहणाचे काम बाकी राहिले आहे.

Web Title: Will go to the 34 villages of the district, the Prosperity Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.