४० हजार शिधापत्रिका ‘आधार’विनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:52 PM2017-11-21T23:52:29+5:302017-11-21T23:53:28+5:30

सर्व व्यवहार एका बटनेवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. यात गरजवंताना धान्य पुरविण्याकरिता असलेल्या शिधापत्रिकांना ‘आधार’ कार्ड संलग्न करणे अनिवार्य असताना यात वर्धा जिल्हा माघारला आहे.

 Without 40 thousand ration cardboard 'base' | ४० हजार शिधापत्रिका ‘आधार’विनाच

४० हजार शिधापत्रिका ‘आधार’विनाच

Next
ठळक मुद्देशासनाच्या सूचनांना खो : यंत्रणा पडते तोकडी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्व व्यवहार एका बटनेवर आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. यात गरजवंताना धान्य पुरविण्याकरिता असलेल्या शिधापत्रिकांना ‘आधार’ कार्ड संलग्न करणे अनिवार्य असताना यात वर्धा जिल्हा माघारला आहे. जिल्ह्यात अद्यापही ४० हजार नागरिकांनी त्यांच्या शिधापत्रिकांना आधारशी संलग्न केले नसल्न्याचे दिसून आले आहे.
लोकहितार्थ असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ खºया गरजूंना मिळावा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शिधापत्रिकाधारकांना आधार जोडणी क्रमप्राप्त केली आहे. विशिष्ट रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना शासनाच्यावतीने अल्प मोबदल्यात धान्यही दिले जाते. परिणामी सध्याच्या घडीला शिधापत्रिकेशी आधार जोडणी हा विषय महत्त्वाचाच झाला आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ९५ हजार ४९२ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी २ लाख ५४ हजार ९४० नागरिकांनी आपल्या शिधापत्रिकेशी आधार जोडणी केली असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात शेतकरी एपीएल योजनेचा लाभ घेणारे ३५ हजार १६५ लाभार्थी असून त्यापैकी ३३ हजार ४९४ नागरिकांनी, अंत्योदय योजनेचे ४४ हजार ६२९ लाभार्थी असून त्यापैकी ३९ हजार ८५९ नागरिकांनी, प्राधान्य गट योजनेचे १ लाख १४ हजार ५३२ लाभार्थी असून त्यापैकी १ लाख १ हजार ९३८ नागरिकांनी आपल्या शिधापत्रिके सोबत आधार जोडणी केली आहे. मोठ्या प्रमाणात अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजवंतांनी आधारशी शिधापत्रिका जोडली नसल्याने जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
ज्या लाभार्थ्यांनी शिधापत्रिका आधारशी संलग्नीत केल्या नाही त्यांना मिळणारा लाभ धोक्यात येण्याची शक्यता आहे. किंबहूना त्यांची शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी शिधापत्रिकांशी त्यांचे आधार कार्ड जोडण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
शासकीय कर्मचाºयांकडूनही कानाडोळा
अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनी आपल्या शिधापत्रिका आधारशी जोडलेली नाही. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाºयांनी आपल्या शिधापत्रिका आधारशी जोडाव्या यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केला. काही वरिष्ठ अधिकाºयांनी या पत्राची दखल घेत आपल्या कार्यालयातील कर्मचाºयांना आधार जोडणी संदर्भात सुचनाही केल्या. परंतु, अनेकांनी या पत्राकडे पाठच दाखविण्यात धन्यता मानल्याची चर्चा विविध शासकीय कार्यालयांमध्ये आहे.
गरजूंना असे दिले जाते स्वस्त धान्य
प्राधान्य गट योजनेच्या लाभार्थ्याला प्रती व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ अनुक्रमे २ व ३ रुपये प्रती किलो दराने दिले जाते. अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती शिधापत्रिका २० किलो गहू व १५ किलो तांदुळ अनुक्रमे २ व ३ रुपये प्रती किलो दराने दिले जाते. एपीएल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ अनुक्रमे २ व ३ रुपये प्रती किलो दराने दिले जाते. तर अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना धान्यसाठा उपलब्धतेनुसार गहू किंवा तांदुळ दहा किलो किंवा ५ किलो गहू व ५ किलो तांदुळ मोफत दिल्या जाते.

शिधापत्रिकेशी आधार जोडणीचे काम जिल्ह्यात सुमारे ९५ टक्के झाले आहे. नावातील स्पेलिंगमध्ये थोडाही बदल असल्यास आधार जोडणीमध्ये व्यत्यय येतो. शिधापत्रिकेशी आधार जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल.
- अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

Web Title:  Without 40 thousand ration cardboard 'base'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.