संघर्षाशिवाय कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही
By admin | Published: July 15, 2015 02:36 AM2015-07-15T02:36:55+5:302015-07-15T02:37:30+5:30
या देशातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करतात. तर आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचा सिंहाचा वाटा आहे.
आयटकचे अधिवेशन : मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका
वर्धा : या देशातील सुजाण नागरिक घडविण्याचे काम अंगणवाडी कर्मचारी करतात. तर आरोग्य व्यवस्थेमध्ये आशा सेविकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना योग्य मोबदला दिलाच पाहिजे. यासाठी संघटना मजबूत करा. कारण संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही. असे आवाहन जि. प.च्या महिला व बांधकल्याण सभापती चेतना मानमोडे यांनी केले.
आयटक संलग्नित अंगणवाडी युनियन व आरोग्य खाते आणि आशा व गटप्रवर्तक संघटनेचे (आयटक) जिल्हा अधिवेशन सोमवारी शहिद काँ. गोविंद पानसरे व्यासपीठ दादाजी धुनिवाले मठ येथे घेण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात त्या बोलत होत्या. मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सरचिटणीस अॅड. माधुरी क्षीरसागर संघटनेचे राज्य अध्यक्ष सुकुमार दामले, राज्य सहसचिव उषा चारभे, राज्य उपाध्यक्ष बी. के. जाधव, गुणवंत डकरे आणि गजेंद्र सुरकार उपस्थित होते.
भारत सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली पेंशन योजना रुजू झालेल्या तारखेपासून सेवा गृहीत धरून लागू करण्याच्या मुख्य मागणीसह संघटनेच्या इतरही मागण्यांसाठी २० जुलै रोजी वर्धा येथे विशाल मोर्चा काढण्यासंदर्भात तसेच २ सप्टेंबर २०१५ रोजी देशव्यापी संपाविषयी ठराव करण्यात आला.
यावेळी संघटनेची तीन वर्षाकरिता जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात अध्यक्षपदी विजया पावडे, कार्याध्यक्ष मंगला इंगोले, उपाध्यक्ष शोभा तिवारी, विमल कौरती, सुनंदा आखाडे, नलिनी चौधरी, सचिव वंदना कोळणकर, सहसचिव ज्ञानेश्वरी डंभारे, माला भगत, पार्बता जुनघरे, संघटन सचिव रेखा काचोळे, निर्मला सातपुते, इरफाना पठाण, वंदना बाचले, कोषाध्यक्ष मैना उईके, संघटक असलम पठाण, सहसंघटक यमुना नगराळे तर सदस्या आशा गळहाट, रेखा पाटील, हिरा बावणे, विजय कौरती, शोभा सायंकार, गिता पालेवाल, सुनिता भगत, सुरेखा रोहणकर, संगीता काळे, रंजना तांबेकर, सुनिता टिपले, विमल करपाचे, बबीता चिमोटे, निर्मला नेहारे, सुनिता बोरकर, मिना ढोके, संगीता ठाकरे, माला कुत्तरमारे, बेबी ठाकरे, रेखा भगत यांची निवड करण्यात आली. संचालन शुभांगी बांगडे तर आभार अरुणा नागोसे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)