मोर्शी व खरसखांडा येथे पाण्यासाठी हाहाकार

By admin | Published: April 11, 2016 02:15 AM2016-04-11T02:15:40+5:302016-04-11T02:15:40+5:30

तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे.

Woe for water at Morshi and Kharskhanda | मोर्शी व खरसखांडा येथे पाण्यासाठी हाहाकार

मोर्शी व खरसखांडा येथे पाण्यासाठी हाहाकार

Next

विहिरी कोरड्या : उपसरपंच स्वर्खाने गावाला पुरवितो पाणी
कारंजा (घाडगे) : तालुक्यतील मोर्शी व खसरखांडा या दोनही गावात पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याच्या थेंबाकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुका टॅँकरमुक्त जाहीर झाल्यामुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला टॅँकरने पाणी पुरवठा करण्याकरिता असमर्थता दर्शविली. गावकऱ्यांची पाण्याची निकड लक्षात घेता येथील उपसरपंच नामदेव देवासे गत एक महिन्यापासून स्वखर्चाने आपल्या टॅँकरने गावाला पाणी पुरवठा करीत आहेत.
मोर्शीची लोकसंख्या जवळपास एक हजार आहे. गावात चार हॅँडपंप व नळयोजनेची एक आणि इतर तीन खाजगी विहिरी आहेत. नळयोजनेची विहीर, हॅँडपंप व इतर खाजगी विहिरींनी तळ गाठला आहे. शेत शिवारातील विहिरींची पातळी अत्यंत खोल गेल्यामुळे, पिण्यासाठी पाणी द्यायला कोणीही तयार नाही.
उपसरपंच देवासे यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयाला याची माहिती कळविली आहे. तालुका टॅँकरमुक्त झाल्यामुळे टॅँकरने पाणी पुरवठा करता येत नाही, असे सांगण्यात आले. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याचे आश्वासन दिले. गावात चारा पाणी नसल्यामुळे गुरांचेही हाल होत आहे. गावातून जनावरांचे स्थलांतरण होत आहे.
यामुळे उपसरपंचाने गावात स्वत:च्या दोन टॅँकरने दररोज पाच टॅँकर पाणी गावाला एक महिन्यापासून पुरवित आहे. ते ठाणेगाव येथील चौबे यांच्या विहिरीतून १०० रुपये प्रति टॅँकर दराने स्वखर्चाने पाणी विकत घेवून गावकऱ्यांची तहान भागवित आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Woe for water at Morshi and Kharskhanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.