हिंगणघाटच्या ‘नॅनो पार्क’मधील घरात सुरु होता ‘देहविक्री’ व्यवसाय; २ आरोपींसह एका महिलेस अटक
By चैतन्य जोशी | Published: March 23, 2023 06:24 PM2023-03-23T18:24:23+5:302023-03-23T18:24:49+5:30
क्राईम इंटेलिजन्स पथकाची कारवाई
वर्धा : हिंगणघाट शहरातील शाहलंगडी परिसरात एका घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायावर क्राईम इंटेलिजन्स पथकाने छापा मारला असता तिन्ही आरोपी एका महिलेकडून आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार करवुन घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपीसह एका महिला आरोपीस अटक केली. ही कारवाई क्राईम इंटेलिजन्स पथकाकडून २२ रोजी रात्री करण्यात आली. पोलिसांनी मंगेश दिलीप सुके, उमेश नारायण कोटकर व एका महिलेला अटक करुन त्यांच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
हिंगणघाट शहरात एका ठिकाणी अवैधरित्या देहव्यापार सुरु असून एक महिला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुली व महिलांकडून पैशाचे आमिष देत ग्राहकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त करुन महिला व मुलींकडून देहविक्री व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीवरुन क्राईम इंटेलिजन्स पथकाने हिंगणघाट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांना माहिती देत त्यांच्या मदतीने शाहलंगडी रोडवर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायावर छापा मारला असता देहविक्रीचा व्यापार सुरु असल्याचे उजेडात आले. पोलिसांनी दोन आरोपींसह एका महिलेस अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, रोशन निंबोळकर, सागर भोसले, मिथून जिचकार, अरविंद इंगोले, धिरज राठोड, राकेश इतवारे, पवन देशमुख, मंगेश आदे, अभिषेक नाईक, हर्षल सोनटक्के, शिरीन शेख, प्रफुल्ल वानखेडे यांनी केली.
बनावट ग्राहक पाठवून केला उलगडा...
पोलिसांनी शाहलंगडी रस्त्यावर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरी पाठविले. दरम्यान त्या बनावट ग्राहकाला तिन्ही आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे दिसून आले. आणि पोलिसांनी छापा मारुन देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करीत उलगडा केला.
महागड्या कारमधून आणत होते ग्राहक
आरोपी मंगेश दिलीप सुके हा त्याच्या एम.एच. ३१ डी.एक्स. ५२ या महागड्या कारमध्ये ग्राहकांना बसवून नॅनो पार्कमधील घरी नेत होता. त्यांच्याकडून भक्कम रक्कम उकळून पीडित महिलांकडून देहव्यापार करवून घेत होता. पोलिसांनी आरोपींकडून पाच महागडे मोबाईल, एक महागडी कार, १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १० लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
बनावट ग्राहक पाठवून केला उलगडा...
पोलिसांनी शाहलंगडी रस्त्यावर असलेल्या नॅनो पार्कमधील एका घरी पाठविले. दरम्यान त्या बनावट ग्राहकाला तिन्ही आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे दिसून आले. आणि पोलिसांनी छापा मारुन देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश करीत उलगडा केला.
महागड्या कारमधून आणत होते ग्राहक
आरोपी मंगेश दिलीप सुके हा त्याच्या एम.एच. ३१ डी.एक्स. ५२ या महागड्या कारमध्ये ग्राहकांना बसवून नॅनो पार्कमधील घरी नेत होता. त्यांच्याकडून भक्कम रक्कम उकळून पीडित महिलांकडून देहव्यापार करवून घेत होता. पोलिसांनी आरोपींकडून पाच महागडे मोबाईल, एक महागडी कार, १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १० लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला