‘लॉकडाऊन’मध्ये चोरट्या महिलेस दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:00 AM2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:50+5:30

दुपारच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावली होती. याप्रकरणी त्यांनी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. देवळी पोलिसांनी तपास करीत वर्ध्यातील तारफैल परिसरातील आरोपी मालती लोंढे हिला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस उपनिरीक्षक खुशाल हर्ले यांनी तपासपूर्ण करून तपासाअंती वर्धा येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

Woman sentenced to two years in lockdown | ‘लॉकडाऊन’मध्ये चोरट्या महिलेस दोन वर्षांची शिक्षा

‘लॉकडाऊन’मध्ये चोरट्या महिलेस दोन वर्षांची शिक्षा

Next
ठळक मुद्देजिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करणाऱ्या चोरट्या महिलेस दोन वर्षे कारवास व १ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्वाळा न्यायाधीश ए. एस. शर्मा यांनी केला.
प्राप्त माहितीनुसार, दीपा गजानन ढोकणे रा. मोहदा या ३१ ऑगस्ट २०१५ मध्ये कोटेश्वर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावली होती. याप्रकरणी त्यांनी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. देवळी पोलिसांनी तपास करीत वर्ध्यातील तारफैल परिसरातील आरोपी मालती लोंढे हिला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस उपनिरीक्षक खुशाल हर्ले यांनी तपासपूर्ण करून तपासाअंती वर्धा येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश ए.एस.शर्मा यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल झाले असता त्यांनी १० साक्षीदार तपासले. आरोपी मालती लोंढे हिच्याविरुद्ध पुरावे मिळून आल्याने त्यांनी मालती लोंढे हिला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे व्ही.व्ही. डोरले यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून त्यांना शिपाई चंद्रकांत काकडे यांनी मदत केली.

Web Title: Woman sentenced to two years in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर