घरगुती भांडणातून युवतीने जाळून घेतले
By admin | Published: February 12, 2017 12:59 AM2017-02-12T00:59:07+5:302017-02-12T00:59:07+5:30
अंबिकापूर येथील २२ वर्षीय युवतीने घरगुती भांडण झाल्याने जाळून घेतले.
अंबिकापूर येथील घटना : उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू
आष्टी (शहीद) : अंबिकापूर येथील २२ वर्षीय युवतीने घरगुती भांडण झाल्याने जाळून घेतले. यात ती ८५ टक्के जळाल्याने तिचा अमरावती येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियंका रावसाहेब केचे (२२) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी घडली
प्रियंका हिच्या लग्नासाठी पाहुणे पाहणे सुरू होते. तिची वहिनी तिच्या आईसोबत नेहमी भांडण करायची. आईला झालेला त्रास पाहुन प्रियंका दुखी व्हायची. कलह वाढल्याने गुरुवारी दुपारी ३.३० वाजता घरी अंगावर रॉकेल ओतुन जाळून घेतले. यामध्ये ती ८५ टक्के जळाल्याने गंभीर अवस्थेत मोर्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तात्काळ अमरावती येथील इर्विन हॉस्पीटल मध्ये भरती केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटना गुरुवारी (२ फेब्रुवारी) घडली. मात्र डायरी अमरावती पोलीस ठाण्यात होती. आष्टी पोलीस ठाण्याला आजपासून कारवाईसाठी डायरी मिळाली. याप्रकरणी ठाणेदार दिलीप ठाकूर, जमादार दिक्षीत तपास करुन पुढील कारवाई करणार आहे.
प्रियंका हिने मृत्यूपूर्वी एका डायरीत सविस्तर घटना लिहून ठेवल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली असून अद्याप काहीही जप्त करण्यात आले नाही. त्या डायरीत नेमके काय आहे, हे तपासाअंती कळणार आहे. घरगुती भांडण एका युवतीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरल्याने तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. सदर घटना घडली तेव्हा घरातील सर्वजण शेतात गेले होते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शिना वस्तुस्थिती माहिती नाही. पोलीस पुढील तपास करीत आहे.
सदर घटना २ फेबु्रवारीला घडली. मात्र आष्टी ठाण्यात चौकशीसाठी प्रकरण शनिवारी प्राप्त झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)