मजुरी करणाऱ्या महिलेचे घर पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:40 PM2017-12-24T23:40:46+5:302017-12-24T23:41:27+5:30

रोजमजुरीकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचे घर पाडण्यात आले. ही घटना स्थानिक केळकरवाडी परिसरात घडली. यात महिलेचे पाच हजाराचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

The woman who paid the wages was demolished | मजुरी करणाऱ्या महिलेचे घर पाडले

मजुरी करणाऱ्या महिलेचे घर पाडले

Next
ठळक मुद्देपाच हजारांचे नुकसान : शहर ठाण्यात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रोजमजुरीकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचे घर पाडण्यात आले. ही घटना स्थानिक केळकरवाडी परिसरात घडली. यात महिलेचे पाच हजाराचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
स्थानिक केळकरवाडी भागातील रहिवासी असलेल्या शोभा प्रकाश कुंभरे या रोजमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करतात. शुक्रवार २२ डिसेंबरला शोभा कुंभरे या घरी नसताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराच्या आवारात येत शोभा यांच्या मालकीची टिनाची झोपडी व तयार केलेले कुंपन तोडले. यात त्यांचे सुमारे पाच हजारांचे नुकसान झाले आहे. घरी परतल्यावर सदर प्रकार लक्षात येताच शोभा यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. शहर पोलिसात सादर करण्यात आलेल्या तक्रारीतून सदर नुकसान नितीन शर्मा व त्याचे दोन सहकाऱ्यांनी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर
या घटनेतील संशयीत आरोपी असलेले नितीन शर्मा हे आर्थिक दृष्ट्या वरचढ आहेत. त्यांच्याकडून शहर पोलिसांना हाताशी घेत आमच्यावर घर सोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्या जात असल्याचा आरोप शोभा कुंभरे यांनी केला आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणीही कुंभरे यांची आहे.

Web Title: The woman who paid the wages was demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.