पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

By admin | Published: May 21, 2017 01:00 AM2017-05-21T01:00:57+5:302017-05-21T01:00:57+5:30

गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे.

The women are hit on the village | पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

पाण्यासाठी महिलांची ग्रा.पं.वर धडक

Next

आठ दिवसांपासून नळ नाही : सरपंचाच्या उत्तराने महिला आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : गावात गत आठ दिवसांपासून नळ न आल्याने नागरिकांची पाण्याकरिता धावपळ होत आहे. यामुळे संतापलेल्या महिलांनी ग्रामपंचायत सदस्य तृप्ती पावडे यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. यावेळी महिलांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया सरपंच व उपसरपंचांना सुनावल्या. त्यावेळी सरपंचांनी विद्युत पुरवठा नियमित नसणे, विद्युत मोटार जळणे, अशी नेहमीची रडगाणी ऐकवत हतबलता व्यक्त केली.
येथील पाणी पुरवठा योजना वर्धा नदीवरुन आहे. नदीला पाणी आहे; पण वारंवार पाण्याचा पंप जळणे, मोटारची पर्यायी व्यवस्था न करणे तसेच पाण्याचे वाटप समप्रमाणात करण्याच्या नियोजनाच्या अभावाने गावात कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी शेतमजूर व गोपालक पाण्यासाठी त्रस्त झाले आहे. रोहण्यातील काही वॉर्डात आठ ते दहा दिवसांपासून नळ आलेले नसताना सरपंचाच्या घराच्या लाईनवरील नळांना दररोज पाणी कसे येते, असा संतप्त सवाल महिलांनी सरपंचासमोर उभा केला. यावर सरपंचाने माझे घर खोलगट भागात आहे, असे सांगताच महिला आणखीच भडकल्या.
आठ दिवसांपूर्वी जळालेली मोटार चालू करताच पुन्हा जळाली असेल तर पर्यायी मोटारची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपचांयतीची आहे, असे महिलांनी यावेळी विचारले. यावर सरपंचांनी तुमच्या शेतातली मोटार जळाल्यावर आठ-दहा दिवस तुमचे ओलीत थांबते की नाही, असे उर्मट उत्तर दिल्याने महिला पुन्हा आक्रमक झाल्या. एकंदरीत ग्रामपंचायत प्रशासन विद्युत पुरवठ्याच्या भारनियमना आड स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

Web Title: The women are hit on the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.